EPF सब्‍स्क्रायबर्ससाठी वाईट बातमी, EPFO 2020-21साठी व्याज कमी करण्यासाठी उद्या होऊ शकतो निर्णय

काम-धंदा
Updated Mar 03, 2021 | 12:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीओफओ 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निधी रकमेवर व्याजाची घोषणा चार मार्च रोजी करू शकते. या घोषणेत ईपीएफ सबस्क्रायबर्ससाठी वाईट बातमी असू शकते.

EPFO
EPF सब्‍स्क्रायबर्ससाठी वाईट बातमी, EPFO 2020-21साठी व्याज कमी करण्यासाठी उद्या होऊ शकतो निर्णय  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • चार मार्च रोजी ईपीएफओकडून घोषणा होण्याची शक्यता
  • पीएफ सबस्क्रायबर्ससाठी असणार मोठा धक्का
  • 2019-20साठी 7 वर्षात सर्वात कमी होता व्याजदर

नवी दिल्ली: पेट्रोल (Petrol), डिझल (diesel) आणि एलपीजीच्या (LPG) वाढत्या किंमतींमुळे (rising prices) त्रस्त असलेल्या वेतन कर्मचाऱ्यांसाठी (salaried employees) आणखी एक वाईट बातमी (bad news) आहे. कर्मचारी भविष्य निधी खात्यात (Employment Provident Fund Organization) जमा असलेल्या रकमेवर आर्थिक वर्ष (financial year) 2020-21साठीच्या व्याजदरात (interest rate) कपात (cut) होऊ शकते. ईपीएफओच्या या निर्णयामुळे 6 कोटीपेक्षा जास्त लोकांवर थेट परिणाम (effect) होणार आहे.

चार मार्च रोजी ईपीएफओकडून घोषणा होण्याची शक्यता

कर्मचारी भविष्य निधी संघटना आर्थिक वर्ष 2020-21साठीच्या भविष्य निधीतील जमा रकमेवरच्या व्याजदराची घोषणा 4 मार्च रोजी करू शकते. यादिवशी संघटनेच्या केंद्रीय न्यासी मंडळाची बैठक श्रीनगरमध्ये होणार आहे. या बैठकीत 2020-21साठीच्या व्याजदराच्या घोषणेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत हा व्याजदर कमी होण्याची दाट शक्यता आहे. हा व्याजदर 2019-20मध्ये 8.5% होता.

पीएफ सबस्क्रायबर्ससाठी असणार मोठा धक्का

ईपीएफओने जर व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला तर हा पीएफच्या सबस्क्रायबर्ससाठी एक मोठा झटका ठरणार आहे कारण आत्तापर्यंत अनेक खातेधारकांना गेल्या आर्थिक वर्षासाठी घोषित व्याज अद्याप मिळालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटादरम्यान मोठ्या संख्येने ईपीएफ सदस्यांनी आपल्या खात्यांमधून रक्कम काढली आहे ज्यामुळे पीएफच्या अंशदानामध्येही घट झाली आहे. त्यामुळे व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

2019-20साठी 7 वर्षात सर्वात कमी होता व्याजदर

ईपीएफओने 2019-20साठी 8.5% व्याजाची घोषणा केली आहे जो गेल्या 7 वर्षांमधील सर्वात कमी आहे. आर्थिक वर्ष 2012-13मध्ये ईपीएफवर व्याजदर 8.5%  होता. गेल्यावर्षी मार्चमध्ये ईपीएफओने व्याजदरात बदल केला होता. यामुळे याआधी आर्थिक वर्ष 2018-19साठी ईपीएफवर 8.65%  व्याज मिळाले होते. आर्थिक वर्ष 2017-18मध्ये ईपीएफवर 8.55% व्याजाचे भुगतान केले होते. आर्थिक वर्ष 2015-16मध्ये व्याजदर 8.8%  होते. आर्थिक वर्ष 2013-14मध्ये ईपीएफवर 8.75%च्या व्याजदराने व्याज देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी