Multibagger Stock : तुफान कमाई करून देणारी कंपनी देणार बोनस शेअर, मोफत वाढणार गुंतवणुकदारांचे शेअर्स

Share Market Investment : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीतून विविध पद्धतीने कमाई होत असते. एखादा शेअर दणदणीत परतावा देऊन कमाई करून देतो. तर कधी एखादी कंपनी डिव्हिडंड (Dividend) जाहीर करते त्यातून कमाई होते. तर कधी एखादी कंपनी शेअरधारकांना बोनस शेअर (Bonus Share) देते, त्यातून शेअर्सची संख्या वाढते आणि परिणामी फायदा वाढतो. आता अशीच एक दमदार कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर देणार आहे. गुंतवणुकदारांना या कंपनीने करोडोंची कमाई करून दिली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • वित्तीय क्षेत्रातील तुफान मल्टीबॅगर शेअर
  • कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 बोनस आणि 5:1 स्टॉक स्प्लिट मंजूर केला
  • गुंतवणुकदारांनी केली करोडोंची कमाई

Multibagger Stock : मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीतून विविध पद्धतीने कमाई होत असते. एखादा शेअर दणदणीत परतावा देऊन कमाई करून देतो. तर कधी एखादी कंपनी डिव्हिडंड (Dividend) जाहीर करते त्यातून कमाई होते. तर कधी एखादी कंपनी शेअरधारकांना बोनस शेअर (Bonus Share) देते, त्यातून शेअर्सची संख्या वाढते आणि परिणामी फायदा वाढतो. आता अशीच एक दमदार कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर देणार आहे. ही कंपनी म्हणजे वित्तीय क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी असलेली बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserve) ही आहे. या कंपनीचा शेअर एक जबरदस्त मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) ठरला आहे. 13 सप्टेंबरला बजाज फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट होणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 बोनस आणि 5:1 स्टॉक स्प्लिट मंजूर केला आहे. म्हणजेच गुंतवणुकदारांना एक शेअरवर एक शेअर बोनस मिळणार आहे. तर असलेल्या शेअरचे विभाजन होऊन एकूण शेअर्सची संख्या वाढणार आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दणदणीत परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स 13 सप्टेंबर रोजी एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिट होतील. बजाज फिनसर्व्हच्या शेअरच्या कामगिरीबद्दल पाहूया. (Bajaj Finserve to give bonus share and split the share in September)

बजाज फिनसर्व्हच्या शेअरने दिला जबरदस्त परतावा

12 वर्षांपूर्वी कंपनीच्या एका शेअरची किंमत (Share Price of Bajaj Finserve) 500 रुपये होती. एखाद्या गुंतवणुकदाराने जर त्यावेळेस या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्या वेळी एकूण 200 शेअर्स मिळाले असते. आता तेच 200 शेअर्स 1:1 बोनस आणि 5:1 स्टॉक स्प्लिटनंतर 2000 (200x5x2) शेअर्समध्ये रूपांतरित होतील. कधीकाळी फक्त  500 रुपयांच्या पातळीवर असणारा या शेअरची किंमत शुक्रवारी 17,330 रुपयांच्या पातळीवर होती. या किंमतीवर शेअरमध्ये स्प्लिट झाल्यास आणि कंपनीने बोनस शेअर दिल्यानंतंर आपोआपच कंपनीच्या एका शेअरची किंमत 1,733 रुपयांपर्यत खाली येईल. या स्थितीत गुंतवणुकदाराला 12 वर्षात सुमारे 35 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

बजाज फिनसर्व्हच्या शेअरची कामगिरी

गेल्या एका महिन्यात बजाज फिनसर्व्हच्या शेअरची किंमत 15,1885 रुपयांवरून 17,330 रुपयांच्या पातळीवर पोचली आहे. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 14.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 13 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या दमदार शेअरमध्ये 2 टक्के वाढ दिसून आली आहे. 12 डिसेंबर 2008 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 103.98 रुपये होती. त्यावेळेस ज्या गुंतवणुकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास 1.66 कोटी रुपये झाले असेल.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी