RBI restrictions on 3 cooperative banks:नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ( RBI)तीन सहकारी बॅंकांवर (Cooperative Banks) निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बॅंकांमधील खातेधारकांना धक्का बसला आहे. तीन सहकारी बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता, रिझर्व्ह बँकेने या सहकारी बॅंकांमधून पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत. आरबीआयने या सहकारी बॅंकांवरील निर्बंधांसंदर्भात निवेदन जाहीर केले आहे. जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक (Jayprakash Narayan Nagari Sahakari Bank), बसमतनगर, सोलापूर येथील करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (the karmala urban co-operative bank) आणि विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक (Durga Co-operative Bank, Vijayawada)अशा या तीन सहकारी बॅंका आहेत. (Bank depositors shocked as RBI imposes restrictions on these 3 cooperative banks)
आरबीआयने म्हटले आहे की, जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक, बसमतनगर येथील बंदीमुळे खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. याशिवाय सोलापूर येथील करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून केवळ 10,000 रुपये काढता येणार आहेत. आरबीआयने विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवरही बंदी घातली आहे. बॅंकेचे खातेधारक त्यांच्या ठेवींमधून 1.5 लाख रुपये काढू शकतात.
अधिक वाचा : Uddhav Thackeray Mumbai: 'राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', उद्धव ठाकरेंची जहरी टीका
याआधीही आरबीआयने अनेक बँकांविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. अलीकडेच आरबीआयने चार बँकांवर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांशी निगडित ग्राहकही आरबीआयने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच पैसे काढू शकतील. ज्या चार सहकारी बँकांवर अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे त्या बॅंका म्हणजे साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सुरी (पश्चिम बंगाल) आणि बहराइचची नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. या आहेत.
अधिक वाचा : Arjun Khotkar Shivsena पत्रकार परिषदेत माजी मंत्री रडत रडत म्हणाले.....
या आदेशानुसार साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत. तर सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ही मर्यादा 50,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत, पैसे काढण्याची प्रति खातेधारक मर्यादा 10,000 रुपये इतकी करण्यात आली आहे. RBI ने बिजनौर-आधारित युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंधांसह खातेधारकांकडून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे.
दरम्यान या तीन बॅंकांना म्हणजे जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक (Jayprakash Narayan Nagari Sahakari Bank), बसमतनगर, सोलापूर येथील करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (the karmala urban co-operative bank) आणि विजयवाडा येथील दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक (Durga Co-operative Bank, Vijayawada) या तीन बॅंका त्यांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँका निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवतील. तिन्ही बॅंकांची घसरलेली आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने हे निर्बंध लादलेले आहेत.