Five Days working Week and Two days week off for Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, बँक कर्मचाऱ्यांना लवकरच आठड्यातून दोन दिवस सुट्टी मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंडियन बँक असोसिएशन (Indian Banks Association - IBA) आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक एम्लॉईज (United Forum of Bank Employees) यांच्यात आठवड्यातून पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी या संदर्भात चर्चा सुरू आहे. जर फाईव्ह डेज वीक सुरू झाले तर बँक कर्मचाऱ्यांना आठड्यातून दोन दिवस सुट्टी मिळेल मात्र, कामकाजाच्या पाच दिवसांत दररोज 40 ते 50 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.
या संबंधी IBA आणि यूनायटेड फोरम ऑफ बँक एम्लॉईज यांच्यात सहमती झाली आहे. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे महासचिव एस नागराजन यांनी सांगितले की, जर बँकांमध्ये पाच दिवस कामकाज करण्याचा नियम लागू करायचा असेल तर त्यासाठी सरकारला निगोशिएबल इंन्स्ट्रूमेंट्स अॅक्टच्या सेक्शन 25 अंतर्गत एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करावे लागेल. सध्या बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जाते.
हे पण वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
एस नागराजन यांनी सांगितले की, सरकारने शनिवारच्या सुट्टीची मागणी मान्य केली तर बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील इतर पाच दिवशी म्हणजेच कामकाजाच्या दिवशी जास्त काम करावे लागणार आहे. म्हणजेच सोमवार ते शुक्रवार बँक कर्मचाऱ्यांना 40 ते 50 मिनिटे अतिरिक्त काम करावे लागेल. म्हणजे सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत काम करावे लागण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : या सवयींमुळे शुक्राणूंची संख्या होते कमी, तुम्हाला तर नाहीये ना?
बँक यूनियन्सकडून दीर्घकाळापासून 5 डेज वीक म्हणजेच पाच दिवस काम करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारत सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांना 5 दिवस वर्किंगची सुविधा लागू केली आणि तेव्हापासून ही मागणी आता आणखी जोरात होऊ लागली आहे.
हे पण वाचा : रात्री गाढ झोप येण्यासाठी काय करावे?