Bank Strike Update: पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, एटीएमसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

Banking Services : पुढील आठवड्यात तुमचे बँकेशी (Bank) संबंधित कोणतेही काम असेल तर तुम्ही घाई करण्याची आवश्यकता आहे. कारण पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. तुमच्या माहितीसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (All India Bank Employee Association)या बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने एक दिवसीय संप (Bank Strike) पुकारला आहे.

Bank Strike
बॅंकेचा संप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर
  • 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर
  • संपाचा फटका ग्राहकांनादेखील बसणार

Bank Strike on 19th November : नवी दिल्ली :  बॅंकिंगशी निगडीत कामे ही आता दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहेत. मात्र पुढील आठवड्यात तुमचे बँकेशी (Bank) संबंधित कोणतेही काम असेल तर तुम्ही घाई करण्याची आवश्यकता आहे. कारण पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. तुमच्या माहितीसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (All India Bank Employee Association)या बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने एक दिवसीय संप (Bank Strike) पुकारला आहे. त्यामुळे या संपाचा बॅंकिंग कामावर परिणाम होणार आहे. म्हणूनच तुमच्या बॅंकिंग कामाचे नियोजन आताच करणे योग्य ठरेल. (Bank Employees to go on bank strike next week)

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

देशभरात बँकांचा संप

बॅंक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. बँक ऑफ बडोदाने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशनला संपावर जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाण्याचे म्हटले आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या या संपामुळे 19 नोव्हेंबरला बँकांचे काम ठप्प होणार आहे. याचा फटका ग्राहकांनादेखील बसणार आहे.

अधिक वाचा : साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट 

देशव्यापी संपाची माहिती

बॅंक कर्मचाऱ्यांच्या युनियन पुकारलेल्या या देशव्यापी संपामुळे बॅंकिंग कामकाजावर परिणाम होणार आहे. बॅंक संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी सर्व योग्य पावले उचलली जात आहेत. मात्र बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँक शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे असे बँकेने म्हटले आहे. तसे पाहता ज्या दिवशी हा संप पुकारण्यात आला आहे त्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारी आहे. बँक प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असते. आता मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी संपामुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. 

अधिक वाचा : Mumbai-Goa महामार्गावर कशेडी घाटात भीषण अपघात; रिक्षा चालकासह तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

शनिवारी देशव्यापी संपामुळे बॅंकिंग कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. यामुळे एटीएम सेवादेखील प्रभावित होऊ शकतात. एटीएमध्ये रोकडचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

हल्ली ऑनलाइन बँकिंग (Online Banking) आणि व्यवहारांचा खूप ट्रेंड आहे. लहान दुकानांवरही तुम्हाला क्युआर कोड (QR Code) स्कॅनर बसवलेले दिसतील. या सुविधांमुळे एकीकडे बँकेशी संबंधित लोकांचे काम सोपे झाले आहे. शिवाय मोबाइल बॅंकिंगमुळे बॅंकिंग व्यवहार सोपे झाले आहेत. मात्र अजूनही अनेक कामे बॅंकांच्या शाखेत जाऊनच करावी लागतात. त्यामुळे संपाच्या दिवशी कामकाज ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी