Income Tax : आपल्या बँक खात्यात करू नका एवढे व्यवहार, नाही तर पडेल इन्कम टॅक्सची धाड

आज कुणाचेही बँकेत खाते नाही असा माणूस नाही. मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगमुळे बँकिंग सुविधा आणखी सुलभ झाली आली आहे. अशा वेळी आपल्याला सायबर क्राईमकडून वाचायचे आहेच. परंतु असे व्यवहार करायचे नाही जेणेकरून इन्कम टॅक्सची वक्रदृष्टी आपल्यावर पडेल आणि आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल.

cash
व्यवहार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज कुणाचेही बँकेत खाते नाही असा माणूस नाही.
  • मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगमुळे बँकिंग सुविधा आणखी सुलभ झाली आली आहे.
  • असे व्यवहार करायचे नाही जेणेकरून इन्कम टॅक्सची वक्रदृष्टी आपल्यावर पडेल

Income Tax : मुंबई : आज कुणाचेही बँकेत खाते नाही असा माणूस नाही. मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगमुळे बँकिंग सुविधा आणखी सुलभ झाली आली आहे. अशा वेळी आपल्याला सायबर क्राईमकडून वाचायचे आहेच. परंतु असे व्यवहार करायचे नाही जेणेकरून इन्कम टॅक्सची वक्रदृष्टी आपल्यावर पडेल आणि आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल. जाणून घेऊया बँक व्यवहार करण्यापूर्वी सरकारचे काय नियम आहेत.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बँकेती मोठ्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असतात. त्यात बँक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड गुंतवणूक, जमीन जुमला खरेदी व्यवहार तसेच शेअर बाजारातील व्यवहारांवरही इन्कम टॅक्स विभागची नजर असते. या सगळ्यांचे व्यवहार करण्यासाठी सरकारने काही मर्यादा आखून दिल्या आहेत. जर या मर्यादा तुम्ही ओलांडल्या तर लगेच तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते.

आयकर विभागाचे अनेक शासकीय विभागासोबत करार झाले आहेत, त्यानुसार मोठ मोठ्या वित्तीय संस्थांकडून त्यांना सर्व प्रकारची माहिती आणि मोठे व्यवहारांचे तपशील कळतात. आयकर विभागाची वक्रदृष्टी पडू नये म्हणून पुढील काही टिप्स फॉलो करा.

सेविंग अकाऊंटर आणि करंट अकाऊंट

आपल्या बचत खात्यातून आर्थिक वर्षात १० लाखांपेक्षा अधिक व्यवहार केल्यास आयकर विभागाला यबाबत माहिती द्या. करंट अकाऊंटची ही मर्यादा ५० लाख इतकी आहे.

बँकेतील मुदत ठेवी म्हणजेच फिक्सड डिपॉजिट 

आपल्या बँकेतील मुदत ठेवीतील व्यवहार १० लाखांपेक्षा अधिक होत असेल तर तुम्ही याबाबत आयकर विभागाला कळवणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे व्यवहार झाल्यास बँकेला ही माहिती आयकर विभागाला द्यावी लागते.

क्रेडिट कार्ड बिल

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाला आणि क्रेडिट कार्डचे बिल एक लाखांपेक्षा अधिक भरणार असाल तर याबाबत आयकर विभागाला कळवणे गरजेचे आहे. आयकर विभाग क्रेडिट कार्डाच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवून असतात. जर तुम्ही आयकर विभागाची नजर चुकवून असे कुठले व्यवहार करत असाल तर तुम्हाला नोटीस आलीच म्हणून समजा. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात १० लाखपेक्षा अधिक क्रेडिट कार्डचे बिल भरत असाल तर आपल्या इन्कम टॅक रिटर्नमध्ये या व्यवहाराची माहिती द्या.   

जंगम मालमत्तेची खरेदी आणि विक्री

जर तुम्ही कुठली मालमत्ता विकत किंवा खरेदी करत असाल आणि त्या मालमत्तेची किंमत ३० लाखहून अधिक असेल तर त्याची माहिती आयकर विभागाकडे द्या. देशातील प्रत्येक रजिस्टार आणि सब रजिस्टार यांना अशा प्रकारच्या व्यवहाराची माहिती देणे बंधनकारक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी