मुंबई : मे महिन्यात ईद-उल-फित्र, बुद्ध पौर्णिमा आणि भगवान श्री परशुराम जयंतीमुळे सुमारे 11 दिवस बँकांना सुट्टी असेल. या सुट्यांमध्ये वीकेंडचाही समावेश होतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे. त्यानुसार, बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे अधिसूचित केले जातात. दुसरा आणि चौथा शनिवार सुटी म्हणून नियुक्त केला आहे. यातील 4 सुट्टी सणांवर तर उर्वरित रविवार-शनिवारी आहेत. बँकांशी संबंधित कामकाजाचा निपटारा करण्यासाठी सुट्टीची तारीख अगोदर जाणून घेणे आवश्यक आहे. (Bank holidays: 11 days bank holiday in May, complete the required work in April)
अधिक वाचा :
Ration Card Update | रेशनकार्ड संदर्भात मोठी बातमी, लवकर करा हे काम, नाहीतर मोठे नुकसान...
या दिवसात सुट्टी असेल
१ मे - रविवार
२ मे - रमजान-ईद (ईद-UI-फित्रा) (सोमवार): केरळमध्ये बँका बंद राहतील.
३ मे - भगवान श्री परशुराम जयंती/रमजान-ईद (ईद-UI-फित्रा)/बसव जयंती/अक्षय तृतीया (मंगळवार): केरळ वगळता देशभरात बँका बंद राहतील.
8 मे-रविवार
९ मे - रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन (सोमवार): बंगालमध्ये बँका बंद राहतील.
14 आणि 15 मे - शनिवार आणि रविवार.
अधिक वाचा :
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, या 3 भत्त्यात होणार वाढ!
16 मे- बुद्ध पौर्णिमा (सोमवार): त्रिपुरा, बेलापूर, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली येथे बँका बंद राहतील.
22 मे - रविवार
28 मे - शनिवार
29 मे - रविवार
अशी सुट्टी आहे.
अधिक वाचा :
बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते या पाच दिवसांतच मिटवा. प्रत्यक्षात एप्रिल महिना संपत आला असून मे महिना बँकांच्या सुट्ट्यांसह सुरू होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला सलग चार दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. खरं तर, भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 साठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे.