Bank Holidays : बँकेची कामं करा लवकर, जानेवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँका असणार बंद

Bank Holidays 2023 in India, Bank Holidays 2023 in Maharashtra : नव्या वर्षाची सुरुवात रविवार 1 जानेवारी 2023 रोजी होत आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारी 2023 मध्ये बँका कोणकोणत्या दिवशी असणार बंद ते जाणून घ्या.

Bank Holidays 2023 in India, Bank Holidays 2023 in Maharashtra
महाराष्ट्रात जानेवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँका असणार बंद  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • केची कामं करा लवकर
 • जानेवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँका असणार बंद
 • ज्यांना बँकेत जाऊन एखादे काम करायचे आहे त्यांनी बँका कोणकोणत्या दिवशी बंद आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे

Bank Holidays 2023 in India, Bank Holidays 2023 in Maharashtra : नव्या वर्षाची सुरुवात रविवार 1 जानेवारी 2023 रोजी होत आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात अर्थात जानेवारी 2023 मध्ये बँका कोणकोणत्या दिवशी असणार बंद ते जाणून घ्या. बँका सुरू असो वा बंद नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, मोबाईल वॉलेट, यूपीआय या सेवा सुरू राहणार आहेत. यामुळे बँकांचे बहुसंख्य आर्थिक व्यवहार विना अडथळा सुरू राहतील. पण ज्यांना बँकेत जाऊन एखादे काम करायचे आहे त्यांनी बँका कोणकोणत्या दिवशी बंद आहेत ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना बँकेत नेमके कोणत्या दिवशी जायचे याचे नियोजन करणे सोपे होईल. । काम-धंदा । बँक

महाराष्ट्रात जानेवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँका असणार बंद

 1. रविवार 1 जानेवारी 2023 - रविवारची सुटी
 2. रविवार 8 जानेवारी 2023 - रविवारची सुटी
 3. शनिवार 14 जानेवारी 2023 - दुसऱ्या शनिवारची सुटी
 4. रविवार 15 जानेवारी 2023 - रविवारची सुटी    
 5. रविवार 22 जानेवारी 2023 - रविवारची सुटी
 6. गुरुवार 26 प्रजासत्ताक दिन - प्रजासत्ताक दिनाची सुटी
 7. शनिवार 28 जानेवारी 2023 - चौथ्या शनिवारची सुटी
 8. रविवार 29 शनिवारची सुटी - रविवारची सुटी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी