Bank Holidays | या आठवड्यात ५ दिवस बंद राहणार बॅंका, चेक करा यादी

Bank Holidays | बॅंकेत जाण्याआधी त्यांच्या सुट्ट्यांची यादी तपासून घ्या. या आठवड्यात छठ पूजा आणि इतर कारणांमुळे खासगी आणि सरकारी बॅंकांना सुट्ट्या आहेत. याआधीच दिवाळीमुळे बॅंकांना सुट्ट्या होत्या.

Bank Holidays
बॅंकांना सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात बॅंकिंगशी निगडीत अनेक कामे डिजिटल स्वरुपात
  • मात्र काही कामे अशी असतात की ज्यांच्यासाठी बॅंकांच्या शाखेत जावे लागते
  • सध्या सणासुदीच्या काळात बॅंकांना अनेक सुट्ट्या

Bank Holidays | नवी दिल्ली: अलीकडच्या काळात बॅंकिंगने कात टाकली आहे. बॅंकिंगशी निगडीत अनेक कामे डिजिटल स्वरुपात होत असतात. नेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग यासारख्या सुविधांमुळे नागरिक घरबसल्याच बॅंकिंगशी संबंधित व्यवहार पूर्ण करत असतात. मात्र काही कामे अशी असतात की ज्यांच्यासाठी बॅंकांच्या शाखेत जावे लागते. चेक क्लियरन्स किंवा केवायसी किंवा कर्जाशी संबंधित कामे, बॅंकिंगशी निगडीत कागदपत्रे सादर करणे इत्यादी काही कामांसाठी बॅंकेच्या शाखेत जावे लागते. सध्या सणासुदीच्या काळात बॅंकांना अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळे बॅंकेत जाण्याआधी त्यांच्या सुट्ट्यांची यादी तपासून घ्या. या आठवड्यात छठ पूजा आणि इतर कारणांमुळे खासगी आणि सरकारी बॅंकांना सुट्ट्या आहेत. याआधीच दिवाळीमुळे बॅंकांना सुट्ट्या होत्या. या आठवड्यात कोणकोणत्या दिवशी बॅंका बंद राहतील ते पाहूया. (Bank Holidays : Banks to remain close for 5 days this week, check the holidays)

कोणकोणत्या दिवशी बॅंकांना असणार सुट्टया -

१० नोव्हेंबर २०२१ (सुर्य पश्ती दल छठ)
छठ पूजा सूर्य देवतेला समर्पित आहे आणि मुख्यत्वे बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील लोक साजरे करतात. अर्थात आता इतर राज्यांमध्येदेखील हा सण साजरा केला जाऊ लागला आहे.

हिंदू परंपरेनुसार भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि सुर्यदेवतेचा आशिर्वाद घेण्यासाठी ही पूजा करतात. चार दिवसीय पर्वात भक्त एकत्र होतात आणि नदी, तलाव किंवा इतर जलस्त्रोतांमध्ये डुबक्या लावतात.

१२ नोव्हेंबर २०२१
वांगला उत्सव (फक्त मेघालय)

१३ नोव्हेंबर २०२१, दुसरा शनिवार

१४ नोव्हेंबर २०२१, रविवार

१९ नोव्हेंबर २०२१ 
गुरू नानक जयंती/कार्तिकी पौर्णिमा

२१ नोव्हेंबर २०२१ , रविवार

२२ नोव्हेंबर २०२१,
कनकदसा जयंती

२३ नोव्हेंबर २०२१
सेंग कुत्सनेम

२७ नोव्हेंबर २०२१, चौथा शनिवार

२८ नोव्हेंबर २०२१ - रविवार

दरम्यान यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेवर (Babaji Date Mahila Sahakari Bank) निर्बंध घातले आहेत. या सहकारी बॅंकेला आता रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीशिवाय व्यवहार करता येणार नाही. कोणतेही कर्ज वितरण किंवा रोख रक्कम यासंदर्भाती व्यवहार बॅंकेला करता येणार नाहीत. याशिवाय रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगी शिवाय बॅंक कोणतीही देणी देऊ शकणार नाही, कोणत्याही वित्तीय व्यवहारात बॅंकेला सहभागी होता येणार नाही. बॅंकेला आपली संपत्ती विकता येणार नाही किंवा स्थानांतरितदेखील करता येणार नाही. बॅंकेची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेने चालू खाते किंवा इतर खातेधारकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेधारकांना ५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेतून काढता येणार नाही. या सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने रिझर्व्ह बॅंकेने (RBI restrictions on Babaji Date Mahila Sahakari Bank)  हे पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की बॅंकिंग अधिनियम १९४९ अंतर्गत ८ नोव्हेंबर २०२१ला बॅंकेचे कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांपर्यत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी