Bank Holidays List in November 2021 | नोव्हेंबरमध्ये एकूण १७ दिवस बंद राहणार बॅंका, पाहा यादी

Bank holidays in November | दिवाळीसारखा वर्षातील सर्वात मोठा सण नोव्हेंबरमध्ये आहे. अनेक सणांच्या दिवशी बॅंकांना सुट्ट्या असतात. त्यात दिवाळीसारख्या सणालादेखील बॅंकांना सुट्टी असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बॅंकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे.

Bank Holidays List in November
नोव्हेंबरमध्ये बॅंकांना असणाऱ्या सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
  • नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर बॅंकांना अनेक दिवस सुट्टी
  • प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी सर्व राज्यांमधील बॅंकांना सुट्टी
  • राज्यांमध्ये विविध सुट्ट्यांना देखील बॅंका बंद

Bank Holidays List in November 2021| नवी दिल्ली: नोव्हेंबर महिन्यात सणासुदीची मोठी धामधूम असणार आहे. दिवाळीसारखा वर्षातील सर्वात मोठा सण नोव्हेंबरमध्ये आहे. अनेक सणांच्या दिवशी बॅंकांना सुट्ट्या असतात. त्यात दिवाळीसारख्या सणालादेखील बॅंकांना सुट्टी असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात (Bank holidays in November 2021) बॅंकांना अनेक दिवस सुट्टी असणार आहे. बॅंकांच्या सुट्टयांच्या दिवशी सर्वसामान्य खातेधारकांना त्यांची बॅंकिंगची कामे करता येत नाहीत. अलीकडच्या काळात नेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंगमुळे अनेक कामे घरबसल्या पूर्ण करता येतात. मात्र अजूनही काही कामे अशी असतात ज्यासाठी बॅंकेच्या शाखेत जावेच लागते. शिवाय प्रत्येक नागरिक नेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंगसारख्या सुविधांचा वापर करतोच असे नाही. अशा परिस्थितीत नोव्हेंबरमधील बॅंकांच्या सुट्ट्या लक्षात घेता तुमची बॅंकेतील कामे लवकरच आटपून घ्या. (Bank Holidays List in November 2021: In November Bank will be closed for 17 days, check the list)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार नोव्हेंबर महिन्यात वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. यामध्ये जर बॅंकांच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश केला तर नोव्हेंबरमधील बॅंकांच्या एकूण सुट्ट्या १७ दिवस असणार आहेत. विविध राज्यांमध्ये बॅंकांना नोव्हेंबर महिन्यात (Bank Holidays In November) कोणत्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत ते पाहूया.

येथे ही बाब लक्षात घेतली पाहिजे की सुट्टीच्या दिवशी बॅंकांच्या शाखेतील किंवा कार्यालयातील कामकाज बंद राहील, मात्र ऑनलाइन किंवा डिजिटल स्वरुपातील बॅंकिंगची कामे मात्र सुरूच राहणार आहेत.

 (Bank Holidays In November)-

तारीख राज्य सण
1 नोव्हेंबर 2021 इंफाल आणि बंगळूरू कन्नड राज्योत्सव, कुट
3 नोव्हेंबर 2021 बंगळूरू नरक चतुर्दशी
4 नोव्हेंबर 2021 बंगळूरू व्यतिरिक्त सर्व राज्य दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन), दीपावली, काली पूजा
5 नोव्हेंबर 2021 अहमदाबाद, कानपुर, गंगटोक, जयपुर, देहरादून, नागपुर, बंगळूरू, बेलापुर, मुंबई आणि लखनऊ दिवाळी (बालि प्रतिपदा), विक्रम संवत नव वर्ष दिवस, गोवर्धन पूजा
6 नोव्हेंबर 2021 इंफाल, कानपुर, गंगटोक, लखनऊ आणि शिमला भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, लक्ष्मी पूजा, दीपावली, निंगोल चाकोबा
7 नोव्हेंबर 2021 सर्व राज्य रविवार
10 नोव्हेंबर 2021 पाटणा आणि रांची छठ पूजा, सूर्य षष्ठी डाला छठ 
11 नोव्हेंबर 2021 पाटणा छठ पूजा
12 नोव्हेंबर 2021 शिलॉंग वांगला त्योहार
13 नोव्हेंबर 2021 सर्व राज्य दूसरा शनिवार
14 नोव्हेंबर 2021 सर्व राज्य रविवार
19 नोव्हेंबर 2021 आयझोल, कानपुर, कोलकाता, चंडीगढ़, जम्मू, जयपुर, देहरादून, नई दिल्ली, नागपुर, बेलापुर, भोपाल, मुंबई, रांची, रायपुर, लखनऊ, श्रीनगर, शिमला आणि हैदराबाद गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा
21 नोव्हेंबर 2021 सर्व राज्य रविवार
22 नोव्हेंबर 2021 बंगळूरू कनकदास जयंती
23 नोव्हेंबर 2021 शिलॉंग सेंग कुत्सनम
27 नोव्हेंबर 2021 सर्व राज्य चौथा शनिवार
28 नोव्हेंबर 2021 सर्व राज्य रविवार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी