Omicron | ओमायक्रॉनने वाढवली बॅंकांची चिंता, सप्टेंबर २०२२ पर्यत थकित कर्ज वाढून ९ टक्क्यांपलीकडे जाण्याची शक्यता

RBI on NPA | बॅंकांच्या थकित कर्जाचा (NPA) विषय ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) लोकांना रोजगार गमवावे लागले आणि व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे त्यांची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता घटली होती. परिणामी बॅंकांच्या थकित कर्जात वाढ झाली होती. आता पुन्हा ओमायक्रॉनमुळे (Omicron) जर अर्थव्यवस्थेला फटका बसला तर बॅंकांच्या बुडित कर्जाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

RBI report on NPA
रिझर्व्ह बॅंकेचा थकित कर्जासंदर्भात इशारा 
थोडं पण कामाचं
  • ओमायक्रॉनमुळे देशातील बॅंकांना फटका बसण्याची शक्यता
  • आगामी काळात बॅंकांच्या थकित कर्जाचे प्रमाण वाढण्याची भीती
  • रिझर्व्ह बॅंकेने आपल्या अहवालात दिला इशारा

Bank NPA to rise | नवी दिल्ली : भारतीय बॅंकांची कामगिरी (Bank), थकित कर्ज हा विषय मागील काही वर्षांपासून चर्चेत असतो. मागील काही तिमाहींमध्ये बॅंकांच्या कामगिरीत सुधारणा दिसत होती. मात्र आता पुन्हा बॅंकांच्या थकित कर्जाचा (NPA) विषय ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic)लोकांना रोजगार गमवावे लागले आणि व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे त्यांची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता घटली होती. परिणामी बॅंकांच्या थकित कर्जात वाढ झाली होती. आता पुन्हा ओमायक्रॉनमुळे (Omicron) जर अर्थव्यवस्थेला फटका बसला तर बॅंकांच्या बुडित कर्जाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यत पोचण्याची भीती रिझर्व्ह बॅंकेने (RBI)व्यक्त केली आहे. (Bank NPAs may cross 9% mark By September 2022 amid Omicron)

रिझर्व्ह बॅंकेचा अंदाज

रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की जर कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला तर बॅंकांच्या एकूण थकित कर्जाचे प्रमाण सप्टेंबर २०२२ पर्यत वाढून ८.१ ते ९.५ टक्क्यांपर्यत पोचू शकते. सप्टेंबर २०२१मध्ये हेच प्रमाण ६.९ टक्के होते. आरबीआयने जाहीर केलेल्या वित्तीय अस्थिरता अहवालात म्हटले आहे की बॅंकांच्या किरकोळ कर्जाच्या व्यवसायावर दबाव वाढल्याचा परिणाम होम लोनवर झाला आहे. यासंदर्भातील थकित कर्जाचे प्रमाण या आर्थिक वर्षात वाढून १० टक्क्यांवर पोचले आहे. मागील अनेक वर्षांपासून छोटे कर्जवितरण हे बॅंकांच्या कर्ज वितरण व्यवसायाचा मुख्य आधार बनले आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये बॅंकांच्या व्यवसायात सुधारणा होत थकित कर्जाचे प्रमाण घटून ६.९ टक्क्यांवर आले आहे. मात्र खासगी क्षेत्रातील बॅंकांच्या थकित कर्जाचे प्रमाण मात्र या कालावधीत वाढले आहे.

ओमायक्रॉनमुळे होऊ शकतो परिणाम

आरबीआयच्या अहवालात थकित कर्जाच्या प्रमाणत सप्टेंबर २०२२ पर्यत वाढ होत ते ८.१ टक्क्यांवर पोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जर ओमायक्रॉनच्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर हे प्रमाण ९.५ टक्क्यांपर्यत पोचू शकते सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या एकूण थकित कर्जाचे प्रमाण सप्टेंबर २०२१ मध्ये ८.८ टक्के होते आणि सप्टेंबर २०२२ पर्यत वाढून ते १०.५ टक्क्यांपर्यत पोचू शकते तर खासगी क्षेत्रातील बॅंकांच्या थकित कर्जाचे प्रमाण या कालावधीत ४.६ टक्क्यावरून वाढून ५.२ टक्के होऊ शकते. परदेशी बॅंकांसाठी हे प्रमाण ३.२ टक्क्यांवरून वाढून ३.९ टक्के होऊ शकते.

भारतात २१ राज्यांमध्ये वाढला ओमयक्रॉनचा संसर्ग

देशात सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सतत वाढते आहे. मागील काही दिवसात ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचे एकूण रुग्ण ७५० वर पोचले आहेत. २१ राज्यांमध्ये हा संसर्ग पसरला आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे २०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात १६० रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोविडच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७७,००० आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी