Interest Rates Update : कर्ज महागले...बॅंकांनी वाढवला व्याजदर, पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम

MCLR Hike : बॅंकांच्या व्याजदरात आत वाढ होते आहे. मागील काही वर्षांपासून बॅंकांचे व्याजदर (Bank Interest rates) खूपच खाली आलेले होते. यामुळे मुदतठेवींवरील व्याज घटले होते. मात्र त्याचबरोबर ग्राहकांना स्वस्तात कर्ज मिळत होते. मात्र आता मागील काही महिन्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बॅंकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली आहे. आता पुन्हा काही बॅंकांनी आपल्या एमसीएलआर (MCLR) रेटमध्ये वाढ केली आहे.

Loan interest rates
कर्जावरील व्याजदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांपर्यंत वाढले
  • कर्जावरील नवीन व्याजदर 12 सप्टेंबरपासून लागू होतील असे बॅंक ऑफ बडोदाने सांगितले
  • तर इंडियन ओव्हरसीज बॅंकेचा नवीन व्याजदर 10 सप्टेंबर 2022 पासून लागू झाला

Loan Interest rates :नवी दिल्ली : बॅंकांच्या व्याजदरात आत वाढ होते आहे. मागील काही वर्षांपासून बॅंकांचे व्याजदर (Bank Interest rates) खूपच खाली आलेले होते. यामुळे मुदतठेवींवरील व्याज घटले होते. मात्र त्याचबरोबर ग्राहकांना स्वस्तात कर्ज मिळत होते. मात्र आता मागील काही महिन्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बॅंकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली आहे. आता पुन्हा काही बॅंकांनी आपल्या एमसीएलआर (MCLR) रेटमध्ये वाढ केली आहे. तुम्ही बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda) किंवा इंडियन ओव्हरसीज बँकेकडून (Indian Overseas Bank)कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या बॅंकांनी आपल्या एमसीएलआर रेटमध्ये वाढ केली आहे. (Bank of Baroda and Indian Overseas Bank rises MCLR)

अधिक वाचा : खांदा आखडला आहे? मग त्यावर व्यायामानं करा उपचार; मिळेल आराम 

तुम्ही बँक ऑफ बडोदा किंवा इंडियन ओव्हरसीज बँकेचे ग्राहक असाल किंवा या दोन्ही बँकांकडून कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर आता तुम्ही या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे. कारण आता या बॅंकांकडून कर्ज घेणे थोडे महाग झाले आहे. बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने कर्ज वितरणासाठी त्यांचे एमसीएलआर( MCLR) दर 0.10 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.

बॅंक ऑफ बडोदाचे नवे व्याजदर

बँक ऑफ बडोदाने आपला एक वर्षाचा एमसीएलआर दर ( MCLR )7.80 टक्क्यांवर वाढवला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर आता 7.65 टक्के आहे. तर तीन वर्षांचा एमसीएलआर 7.50 टक्के आहे. बँक ऑफ बडोदाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की कर्जावरील नवीन व्याजदर 12 सप्टेंबरपासून लागू होतील.

अधिक वाचा : 'या' स्थितीत झोपताना चुकूनही घेऊ नका उशी, मिळतील फायदे

इंडियन ओव्हरसीज बँकेचे नवे व्याजदर

त्याचवेळी इंडियन ओव्हरसीज बँकेने जारी केलेल्या नियामक नोटीसमध्ये म्हटले आहे की त्यांनी सर्व रकमेच्या विभागांमध्ये एमसीएलआर दर 0.10 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत. शनिवारपासून (10 सप्टेंबर 2022) कर्जावरील हे नवीन दर लागू झाले आहेत. त्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांसाठी कर्ज घेणे महाग होणार आहे. किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरात (MCLR) वाढ झाल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतील. यामध्ये कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज यांचा समावेश आहे. एक वर्षाचा एमसीएलआर ( MCLR)आता 7.65 टक्के झाला आहे. तर दोन वर्षांचा आणि तीन वर्षांचा एमसीएलआर ( MCLR) 7.80 टक्के आहे.

अधिक वाचा : गणपती विसर्जनातील डॉल्बी समोरील लेझर शो ठरला घातक, तब्बल ६३ जणांच्या डोळ्याला गंभीर इजा, मोबाईलचे कॅमेरेही पडले बंद

एमसीएलआर म्हणजे काय

एमसीएलआर  (MCLR) म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. कोणत्याही बँकिंग/वित्तीय संस्थेसाठी हा एक प्रकारचा संदर्भव्याजदर किंवा अंतर्गत बेंचमार्क आहे. याच्या आधारावरच बॅंका आपले व्याजदर ठरवत असतात.

आगामी काळातदेखील व्याजदरात वाढ होण्याचीच चिन्हे आहेत. जगभरात महागाईचा आगडोंब उसळल्यामुळे महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वच प्रमुख मध्यवर्ती बॅंकांनी व्याजदरात वाढ करण्याचे पतधोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मुदतठेवी आणि कर्ज दोन्हीवरील व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी