Bank Of Baroda Recruitment | बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरभरती...१०५ पदे भरणार

Bank Of Baroda Jobs : बॅंक ऑफ बडोदा नोकरभरती करते आहे. बॅंक ऑफ बडोदात १०५ जागांसाठीची भरती केली जाणार आहे. ही पदे ग्रामीण आणि कृषी बॅंकिंग विभागाशी निगडीत आहेत. बॅंकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार ४७ कृषी पणन अधिकारी पदांची भरती होणार आहे तर संपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ५८ जागांची भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२२ पर्यत आहे.

Bank Of Baroda Recruitment
बॅंक ऑफ बडोदातील नोकरभरती 
थोडं पण कामाचं
  • बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरभरती
  • १०५ जागांसाठी भरती, २७ जानेवारी पर्यत अर्जाची मुदत
  • ग्रामीण आणि कृषी बॅंकिंगशी निगडीत पदे

Bank Of Baroda Recruitment : नवी दिल्ली : बॅंकेतील नोकरीचे आकर्षण आजही कमी झालेले नाही. बॅंकेत नोकरी करण्याची संधी अनेक तरुण शोधत असतात. त्यातच ती बॅंक जर सरकारी असेल तर मग त्यातील नोकरीवर उड्याच पडतात. बॅंक ऑफ बडोदा नोकरभरती करते आहे. बॅंक ऑफ बडोदात १०५ जागांसाठीची भरती केली जाणार आहे. ही पदे ग्रामीण आणि कृषी बॅंकिंग विभागाशी निगडीत आहेत. बॅंकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार ४७ कृषी पणन अधिकारी पदांची भरती होणार आहे तर संपत्ती व्यवस्थापन विभागासाठी ५८ जागांची भरती होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२२ पर्यत आहे. (Bank of Baroda to recruit 105 vacancies, apply online)

बॅंक ऑफ बडोदात नोकरीची संधी
बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार कृषी पणन अधिकारीपदासाठी कृषी किंवा संबंधित विषयातील किमान ४ वर्षांची पदवी आणि संबंधित विषयाची दोन वर्षांची पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराला किमान ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ ला २५ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित जागांसाठी वयोमर्यादेत सवलत असणार आहे. 

संपत्ती व्यवस्थापन विभागातील पदे
बॅंकेने संपत्ती व्यवस्थापन विभागातील ५८ पदांच्या नोकरभरतीची माहिती दिली आहे. या पदांमध्ये वेल्थ स्ट्रॅटेजिस्टची २८ पदे, खासगी बॅंकरची २० पदे आणि इतर पदांचा समावेश आहे. बॅंक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. बॅंकेची नोकरभरतीसाठीची अधिसूचना देखील बॅंकेच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे.

वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची सुरूवात ७ जानेवारी २०२२ पासून होतेआहे आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जानेवारी २०२२ पर्यत आहे. बॅंक ऑफ बडोदा ही एक सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक आहे. देशातील ही एक महत्त्वाची बॅंक आहे.

बॅंकेतील करियर

याआधी स्टेट बॅंकेनेदेखील मोठी नोकरभरती केली होती. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून वेळोवेळी नोकरभरती केली जाते असते. बॅंकिंगमध्ये रस असणाऱ्यांना या बॅंकांमधून करियरची उत्तम संंधी आहे. बॅंक ऑफ बडोदा आणि एसबीआय या देशातील आघाडीच्या बॅंका आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. बॅंकेतील करियर हे अतिशय सुरक्षित आणि चांगले करियर समजले जाते. देशभरातून उमेदवार बॅंकेत नोकरी करण्यास इच्छुक असतात. बॅंकिंग क्षेत्रात आगामी काळात मोठ्या संधी निर्माण होणार असून बॅंकेत करियरची मोठीच संधी असणार आहे. त्यामुळे बॅंकेत नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा. बॅंका वेळोवेळी नोकरभरती करत असतात. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असते. 

कोरोनाच्या संकटकाळात मंदावलेली नोकरभरतीची प्रक्रिया आता पुन्हा वेगाने सुरू होते आहे. आगामी काळात या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी