बँकांचा नोव्हेंबर महिन्यात लाक्षणिक संप

Bank Strike on 19 November 2022 in India Banking Services to Remain Affected As AIBEA Calls For Day-long Protest : ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशनने (All India Bank Employees Association - AIBEA) शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हा एक दिवसाचा संप आहे.

Bank Strike on 19 November 2022 in India Banking Services to Remain Affected As AIBEA Calls For Day-long Protest
बँकांचा नोव्हेंबर महिन्यात लाक्षणिक संप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बँकांचा नोव्हेंबर महिन्यात लाक्षणिक संप
  • शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरात लाक्षणिक संप
  • ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशनने पुकारला आहे लाक्षणिक संप

Bank Strike on 19 November 2022 in India Banking Services to Remain Affected As AIBEA Calls For Day-long Protest : ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशनने (All India Bank Employees Association - AIBEA) शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हा एक दिवसाचा संप आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच दर रविवारी बँकांना सुटी असते. पण संपामुळे नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारीही बँका बंद असतील.

नोव्हेंबर महिन्यात 5, 12, 19 आणि 26 या 4 तारखांना शनिवार आहे तर 6, 13, 20 आणि 27 या 4 तारखांना रविवार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 12 आणि 26 नोव्हेंबरच्या शनिवारी तसेच 6, 13, 20 आणि 27 नोव्हेंबरच्या रविवारी बँका सुटीमुळे बंद असतील. पण लाक्षणिक संपामुळे बँकांचे कामकाज 19 नोव्हेंबर 2022 च्या शनिवारी कोलमडणार आहे. संपामुळे बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावी. 

युनिलिव्हरला ग्रहण !, Dove आणि Tresemme Shampoo मुळे कॅन्सरचा धोका

Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स

बँकांनी जी कामं आधी बँकेतच व्हायची त्यातलीच निवडक कामं कमी खर्चात करून घेण्यासाठी कंत्राटी स्वरुपात बाहेर दिली आहेत. ऑनलाइन पद्धतीने या कामांची पाहणी बँकेचे अधिकारी करतात. नवी व्यवस्था लागू केल्यानंतर बँक व्यवस्थापनाने कर्मचारी कपात सुरू केली आहे. बँक व्यवस्थापनांच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे.

सोनाली बँक, MUFG बँक, फेडरल बँक आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक येथे कार्यरत असलेल्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशनच्या प्रमुख नेत्यांना आणि सदस्यांना कामावरून काढून टाकले आहे अथवा त्यांची लांबच्या ठिकाणी बदली केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक यांनी पण कामं कमी खर्चात करून घेण्यासाठी कंत्राटी स्वरुपात बाहेर दिली आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे तडकाफडकी 3300 पेक्षा जास्त स्टाफची बदली करण्यात आली. देशातील अनेक बँकांमधून युनियनच्या अधिकारांचे उल्लंघन सुरू आहे. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे; असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशनने सांगितले. संपाच्या निमित्ताने मोर्चा, धरणे आंदोलन पण होणार असल्याचे असोसिएशनने सांगितले.

किरकोळ रकमांचे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना एटीएम, डिजिटल ट्रान्झॅक्शन हे पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे बँकांच्या लाक्षणिक संपाचा त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. मोठे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना संपाचे आणि सुटीचे दिवस लक्षात ठेवून बँकेशी संबंधित कामं लवकर पूर्ण करून घेणे सोयीचे ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी