Bank strike on November 19: आपली बॅंकेतील कामे लगेच आटपून घ्या! बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप...एटीएमवरदेखील होणार परिणाम

Banking Update : 19 नोव्हेंबरला बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप आहे. त्यामुळे बॅंक शाखांबरोबरच एटीएम सेंवावरदेखील (Banking Services)परिणाम होणार आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या युनियनने हा संप पुकारला आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर ( Bank Employees On Strike)जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने एक दिवसीय संप पुकारला आहे.

Bank Strike
बॅंक कर्मचारी देशव्यापी संपावर  
थोडं पण कामाचं
  • बॅंक सेवांना बसणार फटका
  • 19 नोव्हेंबर 2022 ला बँक कर्मचारी संपावर
  • तुमच्या बॅंकिंग कामाचे करा नियोजन

Bank Strike on 19th November : नवी दिल्ली : बॅंकेतील तुमची कामे असतील तर लगेच आटोपून घेणे योग्य ठरेल. एटीएममधून पैसे काढायचे असतील तर पुरेशी रोकड काढून ठेवा. कारण बॅंकेचा देशव्यापी संप (Bank strike) असणार आहे. 19 नोव्हेंबरला बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप आहे. त्यामुळे बॅंक शाखांबरोबरच एटीएम सेंवावरदेखील (Banking Services)परिणाम होणार आहे. बॅंक कर्मचाऱ्यांच्या युनियनने हा संप पुकारला आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर ( Bank Employees On Strike)जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने एक दिवसीय संप पुकारला आहे. (Bank employees to go nationwide strike on 19th November)

अधिक वाचा  : बुलडोझरच्या भीतीपोटी राणे पाडताय अधीश बंगल्याचं बांधकाम

बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे बँक ऑफ बडोदाने स्टॉक एक्स्चेंजकडे आपल्या नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशन (इंडियन बँक असोसिएशन) ला संपावर जाण्यास सांगितले आहे. आपल्या नोटीसमध्ये बॅंक कर्मचाऱ्यांच्या युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाण्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या 19 नोव्हेंबरला बँकांचे काम ठप्प होणार आहे.

अधिक वाचा  : Thieves Study: चोरी करण्यापूर्वी चोर घर कसे निवडतात माहित आहे? चोर लक्षात घेतात हे मुद्दे

बँक संपाची स्थिती

देशव्यापी बॅंक संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालयांमध्ये कामकाज सुरू ठेवण्यासाठी सर्व योग्य ती पावले उचलली जात आहेत. मात्र जर युनियन हाक दिल्याप्रमाणे सर्व बँक कर्मचारी संपावर गेले बँकेच्या शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असेही बँकेने म्हटले आहे. तसे पाहता 19 नोव्हेंबर 2022 हा शनिवार आहे. इथे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असते. आता संप तिसऱ्या शनिवारी असणार आहे. त्याचा बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे.

अधिक वाचा  : दर गुरुवारी म्हणा साई बाबांची आरती

बॅंक कर्मचाऱ्यांचा शनिवारी देशव्यापी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवारी सुट्टी असेल. त्यामुळे सलग दोन दिवस बॅंकिंग सेवांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. म्हणूनच जर तुमचे बॅंकेतील काही काम असेल तर ते लगेच पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला याचा फटका बसू शकतो. दुसऱ्याच दिवशी रविवार असल्याने सर्वसामान्यांना दोन दिवस एटीएममध्ये पैशांच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे गरजेपुरती रोख रक्कमदेखील काढून ठेवा. अर्थात कर्मचाऱ्यांच्या या देशव्यापी संपाचा फटका ग्राहकांना बसू नये यासाठी बॅंका प्रयत्नशील आहेत.

अलीकडच्या काळात डिजिटल सेवांचा विस्तार झाल्यानंतर नेट बॅंकिंग आणि मोबाइल बॅंकिंग सेवा लोकप्रिय झाल्या आहेत. अनेकजण त्यामुळे या सेवांचा लाभ घेत असतात. डिजिटल बॅंकिंगमुळे प्रत्यक्ष बॅंकेच्या शाखेत जाण्याची गरज भासत नाही. बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल सेवांचा आधार ग्राहकांना मिळू शकतो. अनेक बॅंका तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या सेवा अधिक सुलभ करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी