Bank Strike Today: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 16, 2021 | 09:31 IST

Bank Strike :जर तुमचं बँकेत काही काम असेल तर तु्म्हाला दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण राष्ट्रीय बँकांच्या (National Banks)खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी (Bank Employees Union) आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

Bank employees on two-day strike from today
दोन दिवस बँक बंद; आजपासून बँक कर्मचारी संपावर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल.
  • संसदेच्या चालू अधिवेशनात बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक आणले जात आहे.
  • दोन दिवसांच्या संपामुळे बँका आता शनिवारी 18 डिसेंबर रोजी सुरू होणार.

Bank Strike : नवी दिल्ली : जर तुमचं बँकेत काही काम असेल तर तु्म्हाला दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण राष्ट्रीय बँकांच्या (National Banks)खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी (Bank Employees Union) आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर असणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन (United Forum of Banks Union) (UFBU) ने दोन दिवसाचा संप पुकारला आहे. या संपात सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी 4 हजार पेक्षा जास्त शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी (Employee) सहभागी होणार आहेत.

 बँक कर्मचारी संपावर गेल्यास त्याचा मोठा परिणाम हा बँकेच्या दैनंदिन कामावर होणार आहे. संपादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. दरम्यान, बँक व्यवस्थापनांनी कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी सर्व शाखांमध्ये पर्यायी कामकाजाची व्यवस्था निर्माण केली आहे. 

संप का केला जात आहे

आर्थिक किंवा बिगर आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या बँकिंग कामासाठी शनिवारची वाट पाहावी लागणार आहे, कारण दोन दिवसांच्या संपामुळे बँका आता शनिवारी 18 डिसेंबर रोजी सुरू होणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे राज्य निमंत्रक महेश मिश्रा यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की, केंद्र सरकार संसदेच्या चालू अधिवेशनात बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक आणत आहे, ज्यामुळे कोणत्याही सरकारी बँकेला खासगी क्षेत्रात टाकण्याचा मार्ग सोपा असेल. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी आणि अधिकारी 16 आणि 17 डिसेंबरला दोन दिवसीय देशव्यापी संपावर जाणार आहेत.

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. 

काय आहेत सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या

एका सरकारी बँकेच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खासगीकरणाविरोधातील बँकांच्या या संपात बँकांचे खासगीकरण झाल्यास त्याचा फटका या बँकांमध्ये खाती ठेवणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना बसेल.  ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे, हा मुद्दा विशेषत्वाने ठेवण्यात आला आहे. 
पाहिले तर त्याचा सर्वात जास्त परिणाम खालच्या वर्गातून आलेल्या खातेदारांवर होईल.

शून्य शिल्लक असलेली खाती उघडण्यासाठी सरकारी बँकांमध्ये ज्या पद्धतीने मदत केली जाते ती खासगी बँकांमध्ये कोणत्याही प्रकारे दिसत नाही. याशिवाय सरकारी बँकांवर आधीच कामाचा बोजा अधिक आहे. तसेच वर्षानुवर्षे सरकारी बँकांमध्ये काम करणारे जे अधिकारी आणि बँकर्स आहेत त्यांना अचानक खासगी बँक कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी