Bank Holidays November 2022 : नोव्हेंबरमध्ये बॅंकांना 10 दिवस सुट्ट्या, पाहा संपूर्ण यादी

Bank Holidays : पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात देखील बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत. बँका (Bank Holidays)अनेक दिवस बंद राहणार आहेत. सण, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या धरल्या तर नोव्हेंबरमध्ये बॅंकांना तब्बल 10 दिवस सुट्ट्या (Bank holidays in November 2022) असणार आहेत. देशातील बॅंकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया निश्चित करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे.

Bank Holidays
बॅंकांच्या सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
  • नोव्हेंबरमधील बॅंकांच्या सुट्ट्या
  • आरबीआयकडून सुट्ट्यांची वर्गवारी
  • कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार

Bank Holidays In November 2022 : नवी दिल्ली : नुकताच दिवाळीसारखा वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण सरला आहे. नुकताच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण होऊन गेला आहे. या काळात तर बॅंकांना सुट्ट्या असतातच. मात्र पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबर महिन्यात देखील बॅंकांना सुट्ट्या असणार आहेत. बँका (Bank Holidays)अनेक दिवस बंद राहणार आहेत.  सण, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या धरल्या तर नोव्हेंबरमध्ये बॅंकांना तब्बल 10 दिवस सुट्ट्या (Bank holidays in November 2022) असणार आहेत. देशातील  बँकांना इतक्या सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही बॅंकेतील तुमच्या कामांचे नियोजन आताच करा. नोव्हेंबर महिना सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जर पुढील महिन्यात तुम्हाला बॅंकिंगची कामे असतील तर हे जाणून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. (Bank to remain close for 10 days in november 2022)

रिझर्व्ह बॅंकेकडून सुट्ट्यांची वर्गवारी

देशातील बॅंकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया निश्चित करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती अशी विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या असतात. ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. नोव्हेंबर महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत हे जाणून घेऊया.

बँकेची कोणतीही कामं असतील तर ती करण्यासाठी बँका कधी-कधी सुरु असतील हे सविस्तरपणे जाणून घ्या. ज्यामुळे तुमचा नाहक वेळ वाया जाणार नाही आणि योग्य वेळेत बँकेतील कामंही पूर्ण होतील.

नोव्हेंबरमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार (Bank Holidays In November 2022)-

1 नोव्हेंबर 2022 - कन्नड राज्योत्सव/कुट - बंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद
6 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 नोव्हेंबर 2022 - गुरु नानक जयंती/कार्तिका पौर्णिमा/रहस पौर्णिमा/वंगाळा उत्सव – आगरतळा, बंगलोर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोची, पणजी, पाटणा, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम वगळता बँका बंद
11 नोव्हेंबर 2022 - कनकदास जयंती / वांगला उत्सव - बंगळुरू आणि शिलाँगमध्ये बँका बंद
12 नोव्हेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
13 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
20 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
23 नोव्हेंबर 2022 - सेंग कुत्सानेम- शिलॉन्ग येथे बँक बंद
26 नोव्हेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
27 नोव्हेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी