Cash Withdrawal | तुमच्या मृत कुटुंबियाच्या बॅंक खात्यातून तुम्ही पैसे काढत आहात का? पाहा कायदेशीर परिणाम

Banking | जर एखाद्या व्यक्तीचे बॅंकेत खाते असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर डेथ क्लेम फाइल करण्याआधी त्याच्या कुटुंबियांनी काही खास बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मृतक व्यक्तीचे बॅंक खाते होते की नाही हे तपासून घ्यावे. यानंतर बॅंक खात्यात नॉमिनी होता की नाही हे तपासावे. जर मृतकने आपल्या बॅंक खात्यासाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी दिले असतील तर त्यातील फक्त एखादीच व्यक्ती पैसे काढू इच्छित असेल तर त्याला इतर नॉमिनीकडून विनाहरकत पत्र घेऊन ते बॅंकेत दाखल करावे लागेल.

Banking
मृत व्यक्तीच्या बॅंक खात्याशी निगडत नियम 
थोडं पण कामाचं
  • कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्याशी निगडीत बॅंकिंगची कामे करावी लागतात
  • कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे बॅंक खाते आणि त्याच्याशी निगडीत काय नियम असतात
  • रिझर्व्ह बॅंकेच्या अशा बाबतीत काय सूचना आहेत

Cash Withdrawal | नवी दिल्ली : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर (Death of Family member) तो एक मोठा भावनिक आणि मानसिक धक्का असतो. मात्र अशा परिस्थितीतही आर्थिक बाबी (Financial work)हाताळाव्या लागतात. अशा दु:खाच्या वेळीदेखील काही कामे पूर्ण करावी लागतात. बॅंकिंगशी (Banking)संबंधित कामेदेखील यातच समाविष्ट आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे बॅंक खाते (bank Account of deceased person) लवकरात लवकर बंद केले पाहिजे का? मृत व्यक्तीच्या बॅंक खात्याच्या एटीएम कार्डचे काय करावे? काय आहेत आरबीआयचे नियम ? जाणून घ्या हे सर्व मुद्दे आणि त्याच्याशी निगडीत बाबी. (Withdrawing money from deceased persons bank account, check the rules)

मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढणे बेकायदेशीर

अलीकडेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात एका व्यक्तीने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरदेखील तिच्या बॅंक खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढले. पतीने पत्नीच्या मृत्यूशी संबंधित कागदोपत्री कारवाई करण्याऐवजी हा सोपा मार्ग शोधला. मात्र पतीचे हे कृत्य उघडकीस आले. बॅंकेने पतीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत पोलिसात तक्रार नोंदवली आहे. यातून हे स्पष्ट आहे की कोणत्याही मृत व्यक्तीच्या बॅंक खात्यातून पैसे काढणे बेकायदेशीर आहे. मग पैसे काढणारी व्यक्ती मृतक व्यक्तीची नॉमिनी (Nominee)असली तरी ते बेकायदेशीर आहे. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याची संपत्ती किंवा पैसे नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर होण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे.

काय आहे नियम?

कायद्यानुसार या प्रकारच्या केसमध्ये पैसे काढणे हे बॅंक आणि इतर कायदेशीर नॉमिनींना फसवण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत कोणी जर पोलिसात तक्रार केली तर त्याचा तपास केला जाईल. यातील आरोपीला दंडदेखील लागू शकतो. जर मृतकने आपल्या बॅंक खात्यासाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी दिले असतील तर त्यातील फक्त एखादीच व्यक्ती पैसे काढू इच्छित असेल तर त्याला इतर नॉमिनीकडून विनाहरकत पत्र घेऊन ते बॅंकेत दाखल करावे लागेल.

या बाबी लक्षात ठेवा

जर एखाद्या व्यक्तीचे बॅंकेत खाते असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर डेथ क्लेम फाइल करण्याआधी त्याच्या कुटुंबियांनी काही खास बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मृतक व्यक्तीचे बॅंक खाते होते की नाही हे तपासून घ्यावे. यानंतर बॅंक खात्यात नॉमिनी होता की नाही हे तपासावे. जर एखाद्या खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पश्चात कुटुंबिय त्याच्या बॅंक खात्यातील रकमेवर दावा करू शकतात.

मृतकाचे बॅंक खाते बंद कसे करायचे

जर मृत व्यक्तीचे बॅंक खाते बंद करायचे असेल तर त्याच्या मृत्यूचे नोटराइज्ड सर्टिफिकेट द्यावे लागेल. स्थानिक प्रशासनाकडून हा मृत्यूचा दाखला घेता येतो. जर एखादा नॉमिनी असेल तर त्याला त्या बॅंक खात्यातील सर्व पैसे मिळतील. मात्र जर मृत व्यक्तीच्या बॅंक खात्याला नॉमिनी नसेल तर त्याच्या कुटुंबातील जो सदस्य उत्तराधिकारी असेल तर त्याला मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आणि आपले मृतकाशी असलेले नाते याची कागदपत्रे बॅंकेत सादर करावी लागतील. शिवाय बॅंक इंडेमनिटी बॉंडचीदेखील मागणी अशा प्रकरणात करते.

काय आहेत आरबीआयचे नियम?

रिझर्व्ह बॅंकेने अशा परिस्थितीत बॅंकांना संवेदनशीलपणे वागण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याची माहिती बॅंकेला देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही. संबंधित कुटुंब जेव्हा या मानसिक धक्क्यातून सावरेल त्यानंतर ते हे काम करू शकतात. आरबीआयच्या सूचनेनुसार जर कुटुंबातील सदस्यांनी पैसे काढण्यासाठी अर्ज दिला तर त्यानंतर बॅंकेला १५ दिवसात ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी