Bank Holidays in August 2022: बँका या आठवड्यात तब्बल 6 दिवस बंद? पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank holidays in August 2022: नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट हॉलिडे, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक क्लोजिंग ऑफ अकाउंट हॉलिडे या तीन शीर्षकांखाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)बँक सुट्ट्यांचे वर्गीकरण करते.

banks are closed for a total of 6 days this week see complete list before going to bank
बँका या आठवड्यात तब्बल 6 दिवस बंद? पाहा सुट्ट्यांची यादी (सौजन्य: iStock)  
थोडं पण कामाचं
  • गेल्या आठवड्यातही एकूण सहा दिवस बँकांचे कामकाज झाले नाही.
  • या आठवड्यातही अनेक दिवस बँका असतील बंद.
  • बँकेत जाण्यापूर्वी बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी आहे ते जाणून घ्या.

Bank Holidays: या महिन्यात अनेक सण आहेत. सणांच्या निमित्ताने ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. जर आपण या आठवड्याबद्दल विचार केला तर या एका आठवड्यात म्हणजे 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2022 दरम्यान बँका फक्त एकाच दिवशी उघडल्या जातील. 

होय, या आठवड्यात बँकांना एकूण सहा दिवस सुट्टी आहे. मात्र, या सुट्ट्यांमध्ये विविध राज्यांतील सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला बँकेचे कोणतेही काम करायचे असेल तर सुट्ट्यांची यादी नीट तपासून घ्या.

अधिक वाचा: LIC मध्ये या पदांसाठी बंपर वॅकेंसी, ग्रॅज्युएटांनी करा लवकरच अर्ज

या आठवड्यात बँका कधी बंद आहेत?

  1. 15 ऑगस्ट 2022 - आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.
  2. 16 ऑगस्ट 2022 - पारशी नववर्ष म्हणजेच शहेनशाही निमित्त मंगळवारी नागपूर, बेलापूर आणि मुंबईतील बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. 
  3. 18 ऑगस्ट 2022 - यानंतर, गुरुवारी कानपूर, डेहराडून, भुवनेश्वर आणि लखनऊमध्ये जन्माष्टमी (श्रावण वद-8) / कृष्ण जयंतीला बँकांना सुट्टी आहे.
  4. 19 ऑगस्ट 2022 - अहमदाबाद, गंगटोक, चंदीगड, चेन्नई, जम्मू, जयपूर, पटना, भोपाळ, रांची, रायपूर, श्रीनगर, शिमला आणि शिलाँग येथे जन्माष्टमी (श्रावण वद-८)/कृष्ण जयंतीला दुसऱ्या दिवशी बँका बंद राहतील.
  5. 20 ऑगस्ट 2022 - श्रीकृष्ण अष्टमीच्या निमित्ताने हैदराबादमधील बँका 18 तारखेला बंद राहतील.
  6. 21 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच रविवारी सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.

अधिक वाचा: Independence Day : हीच ती वेळ! सोने 100 रुपयांखाली; पेट्रोल अवघ्या 25 पैशात, स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती वाढली महागाई?

बँकेची कामे या दिवशीच पूर्ण करता येईल.

या आठवड्यात तुमच्याकडे बँकेची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी फक्त एकच दिवस आहे, तो म्हणजे 17 ऑगस्ट 2022 चा दिवस.

या आहेत पुढील आठवड्यातील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holiday List August 2022) -

तारीख राज्य सुट्टी
27 ऑगस्ट 2022 सर्व राज्य चौथा शनिवार
28 ऑगस्ट 2022 सर्व राज्य रविवार
29 ऑगस्ट 2022 गुवाहाटी श्रीमंत शंकरदेव तिथी
31 ऑगस्ट 2022 अहमदाबाद, चेन्‍नई, नागपूर, पणजी, बंगळुरु, नवी मुंबई, भुवनेश्वर, मुंबई आणि हैदराबाद संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/गणेश चतुर्थी/वरसिद्धि विनायक व्रत/विनायक चतुर्थी

यामुळेच बँकेची कोणतीही कामं असतील तर ती करण्यासाठी बँका कधी-कधी सुरु असतील हे सविस्तरपणे जाणून घ्या. ज्यामुळे तुमचा नाहक वेळ वाया जाणार नाही आणि योग्य वेळेत बँकेतील कामंही पूर्ण होतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी