PNB vs HDFC Bank vs SBI Interest rates : नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाई नियंत्रित करण्यासाठी आपल्या प्रमुख रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका मुदत ठेवींवर (FDs) व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे एकीकडे कर्जे महाग होत आहेत तर दुसरीकडे बॅंकांच्या मुदतठेवीवरील व्याजदरात (Bank Interest rates) देखील वाढ होते आहे. अनेक बॅंकांनी व्याजदर वाढवण्यास सुरूवात केली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ही यादीत सामील होणारी आणखी एक बॅंक आहे. बॅंकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नवे व्याजदर 4 जुलैपासून लागू होतील. (Banks are raising interest rates on fixed deposit, check the interest rates of top banks)
अलीकडे, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेसह अनेक बॅंकांनी त्यांच्या ठेवी आणि कर्ज दोन्हीसाठी त्यांचे व्याजदर वाढवले आहेत. पंजाब नॅशनल बँक (PNB),एचडीएफसी (HDFC Bank) बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर सध्याच्या मुदत ठेव (FD) व्याजदरांची तुलना इथे दिली आहे.
अधिक वाचा : ITR Filing: कमी पगार असूनही टीडीएस कापला गेला आहे, नो टेन्शन! असा मिळेल रिफंड
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.50 टक्के
46 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.75 टक्के
91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.50 टक्के
180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.00 टक्के
1 वर्ष: सामान्य लोकांसाठी - 5.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.80 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांवरील: सामान्य लोकांसाठी - 5.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.80 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षे वरील: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षांवरील: सामान्य लोकांसाठी - 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.10 टक्के
1111 दिवस: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के.
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी - 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.25 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी - 2.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.25 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.75 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.75 टक्के
91 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी - 3.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.25 टक्के
6 महिने 1 दिवस ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी - 4.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.15 टक्के
9 महिने 1 दिवस ते 9 महिने: सामान्य लोकांसाठी - 4.65 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.15 टक्के
1 वर्ष: सामान्य लोकांसाठी - 5.35 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.85 टक्के
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.35 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.85 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.00 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.70 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.20 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी - 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.50 टक्के
अधिक वाचा : Income Tax Tips | म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे का? कशी कराल करबचत? या आहेत करबचतीच्या टिप्स...
7 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी - 2.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 3.40 टक्के
46 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी - 3.90 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.40 टक्के
180 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी - 4.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 4.90 टक्के
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 4.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.10 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 5.30 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.80 टक्के
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 5.35 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.85 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी - 5.45 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 5.95 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंत: सामान्य लोकांसाठी - 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी - 6.30 टक्के.
महागाई नियंत्रित करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जूनच्या सुरुवातीस मुख्य रेपो दर 50 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवला. आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीने 40 बेसिस पॉइंट्सने वाढवल्यानंतर ही जवळपास महिन्याभरातील दुसरी वाढ होती. मे महिन्यात किरकोळ महागाई 7.04 टक्के होती. हा आकडा आरबीआयच्या 2-6 टक्क्यांच्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त आहे.