Bank Holidays: डिसेंबर महिन्यात इतके दिवस असेल बँक बंद

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Dec 01, 2019 | 16:25 IST

Bank Holidays in December: 2019 वर्षांचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. आज 1 डिसेंबर आहे. या महिन्यात असलेल्या बँक हॉलिडेमुळे तुम्हांला काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुम्हांला आज बँक हॉलिडेबद्दल सांगणार आहोत. 

Bank Holidays
Bank Holidays: डिसेंबर महिन्यात इतके दिवस असेल बँक बंद 

थोडं पण कामाचं

  • 2019 वर्षांचा शेवटचा महिना सुरू झाला आहे.
  • या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात तुम्हांला पैशांची (कॅश) कमतरता पडू नये.
  • बँकेला सुट्टी असल्यामुळे एटीएम मशीनमध्येही कॅशची समस्या उद्भवू शकते.

मुंबईः  2019 वर्षांचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. आज 1 डिसेंबर आहे. या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात तुम्हांला पैशांची (कॅश) कमतरता पडू नये. तसंच तुमचं बँक संबंधित कामं रखडू नये यासाठी तुम्हांला आधीपासूनच प्लान करावा लागणार आहे. यासाठी आज आम्ही तुम्हांला बँक हॉलिडेबद्दल माहिती देणार आहोत. कारण या महिन्यात जवळपास 9 दिवस बँक बंद असणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे बँक हॉलिडे बघून बँकेची कामं आधीच उरकून घ्या. 

बँकेला सुट्टी असल्यामुळे एटीएम मशीनमध्येही कॅशची समस्या उद्भवू शकते. या महिन्यात डिसेंबरमध्ये पाच रविवार आहेत. म्हणजेच 1, 8, 15, 22, 29 या तारखेला रविवार आहेत. त्यामुळे या पाचही दिवस रविवारी बँक बंद असतील. 

या व्यतिरिक्त 14 डिसेंबर दुसरा शनिवार आणि 28 डिसेंबरला चौथा शनिवारी देखील बँका बंद असतील. तर या महिन्यात 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्यानं बँक बंद असणार आहेत. त्यामुळे 5 रविवारसह शनिवार आणि ख्रिसमसची सुट्टी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसंच प्रत्येक राज्यानुसार बँकेच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. तुम्ही RBI च्या ऑफिशियल साइटवर जाऊन सुट्ट्यांची यादी बघू शकता. 

2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांना बँक हॉलिडेची कोणतीच सुट्टी मिळणार नाही आहे. 26 जानेवारीला रविवार आल्यानं बँक ग्राहकांची एक सुट्टी वाया जाणार आहे. याव्यतिरिक्त एकही बँक हॉलिडे जानेवारी महिन्यात नसणार आहे. जानेवारी महिन्यात चार शनिवार आहेत. त्यामुळे दुसरा आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना आपली हक्काची सुट्टी मिळेल. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रखडलेली बँकेची काम तुम्ही जानेवारी महिन्यातही करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी