Bank Holidays in February update : नवी दिल्ली : अनेक राज्ये किंवा प्रदेशांमध्ये सणासुदीमुळे आणि शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे फेब्रुवारी 2022 (February 2022) मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद (February Bank Holidays)राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या फेब्रुवारीच्या सुट्ट्यांची यादीनुसार देशातील विविध भागांमध्ये काही निवडक दिवशी बँका बंद राहतील. मात्र, शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. शिवाय, बसंत पंचमी आणि गुरु रविदास जयंती या प्रसंगी देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद राहतील. (Banks to remain closed for 12 days in February, check the dates)
आरबीआयने बँकेच्या सुट्ट्या तीन प्रकारात विभागल्या आहेत - निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी, रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे; आणि बँकांचे क्लोझिंग अकाउंट्स. देशाच्या विविध भागात स्थानिक सण आणि प्रसंगी बँकाही बंद राहतील. तथापि, अशा प्रसंगी देशातील सर्व बँका बंद राहणार नाहीत. उदाहरणार्थ, २ फेब्रुवारीला सोनम ल्होछारच्या निमित्ताने गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. त्याचप्रमाणे निवडक राज्यांतील बँका काही दिवस बंद राहतील तर इतर राज्यांतील बँका इतर दिवशी बंद राहतील.