June Month Bank Holidays: जूनमध्ये 12 दिवस बंद राहतील बँका; लवकर करुन बँकेची कामे नाहीतर होईल अडचण

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jun 02, 2022 | 09:25 IST

जून महिना सुरू झाला आहे, जर तुम्ही या महिन्यात बँकेशी संबंधित कामे करण्याचा विचार करत असाल, तर ग्राहकांनी विशेषत: या महिन्यात सतर्क राहण्याची गरज आहे. बँकेची काम झाले नाहीतर तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. कारण जून महिन्यात बँका १२ दिवस बंद राहणार आहेत.

Banks will be closed for 12 days in June
जूनमध्ये 12 दिवस बंद राहतील बँका  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी करते.
  • जून महिन्यात बँका १२ दिवस बंद राहणार आहेत.

June Month Bank Holidays: जून महिना सुरू झाला आहे, जर तुम्ही या महिन्यात बँकेशी संबंधित कामे करण्याचा विचार करत असाल, तर ग्राहकांनी विशेषत: या महिन्यात सतर्क राहण्याची गरज आहे. बँकेची काम झाले नाहीतर तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. कारण जून महिन्यात बँका १२ दिवस बंद राहणार आहेत. या बँक सुट्ट्या सण, विशेष दिवस आणि शनिवार व रविवार या दिवशी बंद असतील. खबरदारी म्हणून आम्ही तुम्हाला जून महिन्यामधील सुट्ट्यांविषयी माहिती देत आहोत... 

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी करते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्यात बँक सुट्टीची तारीख आणि कारण दिलेले आहे. सुट्टीच्या यादीनुसार जून महिन्यात एकूण 12 सुट्या आहेत. यामध्ये साप्ताहिक दिवस, गुरु अर्जुन देव जी यांचा हुतात्मा दिवस, महाराणा प्रताप जयंती, संत कबीर जयंती आणि अनेक राज्यांच्या स्थापना दिवसांचा समावेश होतो. 

कोणत्या दिवशी कोणत्या राज्यातील बँका राहतील बंद वाचा 

2 जून दिन (गुरुवार) - हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि हरियाणामधील बँका महाराणा प्रताप जयंती/तेलंगणा स्थापना दिनानिमित्त बंद राहतील. 
 3 जून दिन (शुक्रवार) - शीख गुरू श्रीगुरु अर्जुन देव यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंजाबच्या बँका बंद राहणार आहेत.
 5 जून -  आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी बँका बंद राहतील.
11 जून - दुसरा शनिवारला बँकांना सुट्टी असते
12 जून - आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी बँका बंद राहतील. 
14 जून - संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त ओडिशा, हिमाचल, पंजाब आणि हरियाणामध्ये बँका बंद राहणार आहेत.
15 जून - ओडिशा, मिझोरम, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधील बँका राजा संक्रांती, गुरु हरगोविंद यांचा जन्मदिन, YMA मुळे बंद राहतील.
19 जून - आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी बँका बंद राहतील.
22 जून - खारची पूजेमुळे फक्त त्रिपुरामधील बंद राहतील.
25 जून - चौथा शनिवार
26 जून - आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने रविवारी बँका बंद राहतील.
30 जून - रमना नी फक्त मिझोराम बँका बंद राहतील.
तरीही, जर तुमच्याकडे खूप महत्त्वाचे काम असेल, तर तुम्ही तुमचे काम नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI द्वारे करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी