Banking, Bank Holiday : ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात १३ दिवस बँका बंद राहणार

Banking, Bank Holiday : ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. सरसकट संपूर्ण देशात तेरा दिवस बँका बंद नसतील.

Banks will be closed for 13 days in August 2022 in India
ऑगस्ट २०२२ मध्ये बँका कोणकोणत्या दिवशी असतील बंद  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात १३ दिवस बँका बंद राहणार
 • सरसकट संपूर्ण देशात तेरा दिवस बँका बंद नसतील
 • वेगवेगळ्या दिवशीच्या सुट्यांमुळे संबंधित दिवशी बँकेत कामकाज होणार नाही

Banking, Bank Holiday : ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. सरसकट संपूर्ण देशात तेरा दिवस बँका बंद नसतील. वेगवेगळ्या दिवशीच्या सुट्यांमुळे संबंधित दिवशी बँकेत कामकाज होणार नाही. पण ऑनलाईन बँकिंग, एटीएम सुरू राहणार आहे. मोबाईल वॉलेट, यूपीआय पेमेंट या सेवा पण सुरू राहणार आहेत. यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद होणार नाही. खातेधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या बँकेला कोणकोणत्या दिवशी सुटी आहे हे समजून घेऊन त्या प्रमाणे नियोजन करावे. बँकेतील कामं पूर्ण करून घेण्याचे नियोजन करावे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असतील. काही दिवशी मात्र देशातील सर्व बँका बंद असतील. 

SRTC  ऑलेक्ट्राच्या 300 EV बसेस प्रवाशी सेवेत आणणार 

Benefits of ITR filing : तुमची कमाई 2.5 लाखांपेक्षा कमी असली तरीही प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचे 3 फायदे...

रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२२ मध्ये बँकांना कोणकोणत्या दिवशी सुटी असेल ते जाणून घेऊ...

ऑगस्ट २०२२ मध्ये बँका कोणकोणत्या दिवशी असतील बंद

 1. १ ऑगस्ट द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोकमध्ये बँका बंद)
 2. ७ ऑगस्ट रविवार
 3. ८ ऑगस्ट मोहरम (जम्मू काश्मीरमध्ये बँका बंद)
 4. ९ ऑगस्ट चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरूवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलॉंग वगळून मोहरम निमित्त देशातील बॅंका बंद
 5. ११ ऑगस्ट रक्षाबंधन
 6. १३ ऑगस्ट दुसरा शनिवार
 7. १४ ऑगस्ट रविवार
 8. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
 9. १६ ऑगस्ट पारशी नववर्ष दिन (मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद)
 10. १८ ऑगस्ट जन्माष्टमी
 11. २१ ऑगस्ट रविवार
 12. २७ ऑगस्ट चौथा शनिवार (देशभर बँका सुरू राहणार, सुटी नाही)
 13. २८ ऑगस्ट रविवार
 14. ३१ ऑगस्ट गणेश चतुर्थी ( महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये बॅंका बंद)
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी