Bank Holidays in May 2021:  'या' तारखांना मे महिन्यात बँकांना राहणार सुट्टी; पहा संपूर्ण यादी 

बँकेला सुट्टी असल्यास तुम्हाला विनाकारण बँकेत फेऱ्या माराव्या लागतील. या महिन्यातील कोणत्या तारखांना म्हणजे मे 2021मध्ये बँक बंद असतील ते जाणून घ्या.

banks will be closed for these days in may 2021 know the bank holiday dates
Bank Holidays in May 2021:  मे महिन्यातील बँक हॉलिडे 

थोडं पण कामाचं

 • कोरोना साथीच्या काळात आपण आपले बँकिंग काम ऑनलाइन माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे
 • अनेकदा ग्राहकांना चेक क्लिअरन्स आणि कर्जाशी संबंधित सर्व्हिसेसह विविध कामांसाठी बँकेत जावे लागते.
 •  या महिन्यातील कोणत्या तारखांना म्हणजे मे 2021मध्ये बँका बंद असतील ते जाणून घ्या. 

Bank Holidays in May 2021: कोरोना साथीच्या काळात आपण आपले बँकिंग काम ऑनलाइन माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु, अनेकदा ग्राहकांना चेक क्लिअरन्स आणि कर्जाशी संबंधित सर्व्हिसेसह विविध कामांसाठी बँकेत जावे लागते. अशा परिस्थितीत आपल्याला हे माहित असले पाहिजे की, ज्या दिवशी आपण आपल्या बँकेत जाणार आहोत.  त्या दिवशी बँक सुरू आहे की त्यांना सुट्टी आहे.  बँकेला सुट्टी असल्यास तुमचा हेलपाटा होतो. या महिन्यातील कोणत्या तारखांना म्हणजे मे 2021मध्ये बँका बंद असतील ते जाणून घ्या. 


मे महिन्यात बँकांना या दिवशी असेल सुट्टी 

 1. 1 मे 2021: या दिवस कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, तेलंगणा, मणिपूर, केरळ, गोवा आणि बिहारमध्ये बँकांना सुट्टी असेल.
 2. 2 मे, 2021:  रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
 3. 7 मे 2021: या दिवशी जुमातुल विदा आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
 4. 8 मे 2021: दुसरा शनिवार असल्याने बँकांना या दिवशी सुट्टी असेल.
 5. 9 मे 2021: या दिवशी रविवारी असल्याने बँकांना आठवड्याचे सुट्टी असेल.
 6. 13 मे 2021: या दिवशी ईद-उल-फितर आहे. यामुळे महाराष्ट्र, जम्मू, काश्मीर आणि केरळमधील बँकांना सुट्टी असेल.
 7. 14 मे 2021: या दिवशी भगवान परशुराम जयंती आहे. तसेच रमजान-ईद आणि अक्षय तृतीया आहे. या दिवशी महाराष्ट्र, जम्मू, केरळ आणि काश्मीरशिवाय संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.
 8. 16 मे 2021: या दिवशी रविवार असल्याने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.
 9. 22 मे 2021: या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
 10. 23 मे 2021: या दिवशी रविवारी असल्याने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.
 11. 26 मे 2021: या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे. यामुळे त्रिपुरा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
 12. 30 मे, 2021: या दिवशी रविवारी असल्याकारणाने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.

अशा प्रकारे मे महिन्यात वरील तारखांच्या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे या तारखांची नोंद घेऊन तुम्ही आपले बँक काम पूर्ण करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी