Bank holidays in May 2022 । नवी दिल्ली : जर तुम्हाला बॅंकेशी संबंधित कोणते काम असेल तर तुम्हाला आता थोडी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान विविध सणांमुळे आजपासून दोन दिवस बॅंका बंद (Bank Band) राहणार आहेत. ईद आणि भगवान परशुराम जयंती/ रमजान-ईद/ बसव जयंती अक्षय तृतीया यामुळे अनेक शहरांमध्ये बॅंका सलग दोन दिवस बंद राहतील. मे महिन्याची सुरूवात बॅंकांच्या सुट्ट्यांसह (Bank holidays) झाली आहे. यापूर्वी १ मे रोजी रविवार म्हणजेच साप्ताहिक सुट्टीमुळे बॅंका बंद होत्या. (Banks will be closed in the city today and tomorrow, Know this information before going to the bank).
अधिक वाचा : राज ठाकरेंच्या अल्टीमेटवर मुस्लिम समाज शांत राहणार - जलील
RBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार (Bank Holidays List 2022), बॅंकिग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी साजरे होणाऱ्या सणांच्या अधिसूचनेवर अवलंबून असतात. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. अशा स्थितीत मार्च महिन्यात बँकांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहून नक्कीच बाहेर पडा नाहीतर तुमच्या कामात व्यत्यय येईल.
ईद-उल-फित्रनिमित्त कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये २ मे रोजी बँका बंद राहतील. आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, पाटणा, पणजी, रायपूर, शिमला, श्रीनगर या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
अधिक वाचा : SpiceJet चं बोईंग B737 विमान लँडिंगदरम्यान वादळात सापडलं
* २ मे रोजी कोची आणि तिरुवनंतपुरममधील बँक कर्मचाऱ्यांना ईद-उल-फित्रची सुट्टी राहिल.
* ३ मे रोजी भगवान परशुराम जयंती/रमजान-ईद/बसव जयंती/अक्षय तृतीया मुळे आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, पाटणा, पणजी, रायपूर, शिमला, श्रीनगर या बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. मात्र कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये या दिवशी बँका सुरू राहतील.
* ८ मे रोजी साप्ताहिक सुट्टी असेल.
* रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त ९ मे रोजी कोलकात्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
* १४ मे रोजी महिन्याचा दुसरा शनिवार त्यामुळे या दिवशी बॅंक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.
* १५ मे रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टी राहिल.
* १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमेमुळे आगरतळा, बेलापूर, चंदीगड, भोपाळ, डेहराडून, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथील बँका बंद राहतील.
* २२ मे रोजी साप्ताहिक सुट्टी असेल.
* २८ मे शनिवारी महिन्याचा चौथा शनिवार या दिवशी बॅंका बंद राहतील.
* २९ मे रविवारी साप्ताहिक सुट्टी राहिल.