Forbes List : बारामतीचं नाव देशातच नाही तर झालं अख्या जगभरात, आर्या तवारेनं Forbes च्या यादीत मिळवले स्थान

काम-धंदा
भरत जाधव
Updated May 05, 2022 | 17:04 IST

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक तरुण-तरुणी चांगली कामगिरी करत आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत. महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे (Arya Taware) हिने राज्य नाही तर देशाच्या बाहेरही बारामतीचं  पोहचवले आहे.

Arya of Baramati in the list of financially influential people
आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बारामतीची आर्या  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • फोर्ब्ज मासिकाने युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील 30 वर्षांखालील 30 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर
  • बांधकाम व्यावसायिकांच्या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे पोर्टल म्हणूनही तिच्या स्टार्टअपने भूमिका बजावली आहे.
  • आर्या तावरेच्या कंपनीचे नाव ‘फ्युचरब्रीक्स’ असे आहे

forbes list : नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक तरुण-तरुणी चांगली कामगिरी करत आपल्या देशाचे नाव उंचावत आहेत. महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे (Arya Taware) हिने राज्य नाही तर देशाच्या बाहेरही बारामतीचं  पोहचवले आहे. आर्या तावरेने ‘फोर्ब्ज’च्या यादीत (forbes list) आपले स्थान मिळवले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आर्या मुळची बारामतीची (Baramati) असून तिचे कुटुंब बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आहे.

बारामतीचं आर्या कशी पोहोचली फोर्ब्जच्या यादीत

फोर्ब्ज मासिकाने युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील 30 वर्षांखालील 30 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीमध्ये आर्या तावरेने स्थान मिळवले आहे. लंडन युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलेल्या आर्या तावरेने वयाच्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना पैसा उपलब्ध करुण्यासाठी व्यवसाय तिने सुरू केला होता. तिच्या या कामाची दखल ‘फोर्ब्ज’ मासिकाने घेतली. 

आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या पहिल्या 30 व्यक्तींच्या यादीमध्ये आर्याच्या नावाचा समावेश आहे. आर्याची कामगिरी साधीसुधी नाही. तर बांधकाम व्यावसायिकांच्या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे पोर्टल म्हणूनही तिच्या स्टार्टअपने भूमिका बजावली आहे. आर्या तावरेच्या कंपनीचे नाव ‘फ्युचरब्रीक्स’ असे आहे. या कंपनीचे आजचे बाजारमूल्य 32.7 कोटी पौंड इतके आहे. ही कंपनी आज 22 वेगवेगळ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी