दुकानदार पिशव्यांचे पैसे मागू शकत नाही, बाटाच्या प्रकरणानंतर निर्णय

काम-धंदा
Updated Apr 19, 2019 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वी बाटा इंडियाविरोधात ग्राहक मंचानं एक मोठा निर्णय घेतला होता. ३ रूपयांच्या बॅगच्या पैशाच्या बदल्यात ९ हजार रूपये देण्याचे आदेश बाटा इंडियाला दिले होते. जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते ? 

Bata India
दुकानदार पिशव्यांचे पैसे मागू शकत नाही, बाटाच्या प्रकरणानंतर निर्णय  |  फोटो सौजन्य: BCCL

Bata India carry Bag Issue: काही दिवसांपूर्वीच बाटा इंडियाला कॅरी बॅगसाठी ३ रूपये मागणं महागात पडलं. चंदीगडमध्ये बाटाच्या शो रूममध्ये कॅरी बॅगसाठी ३ रूपये मागितले होते. त्यावेळी ग्राहकानं ग्राहक मंचाकडे बाटा इंडियाची तक्रार नोंदवली होती. त्यावर ग्राहक मंचानं कॅरी बॅगसाठी ३ रूपये घेतल्यानं ९ रूपयांचा दंड ठोठावला होता. कायदे तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ग्राहक मंचाचा हा आदेश पूर्ण देशात कायदेशीरपणे लागू होईल. तसंच जर का कोणत्याही स्टोरमधून सामान खरेदी केलं आहे आणि तिथूनच तुम्ही कॅरी बॅग घेतली तर दुकानदार त्या कॅरी बॅगचे वेगळे पैसे ग्राहकाकडून घेऊ शकतं नाही. ग्राहक मंचाचा हा आदेश दिनेश प्रसाद रातुरी  यांच्या तक्रारीनंतर देण्यात आला आहे. 

दिल्लीतले वकिल सागर सक्सेना यांनी सांगितलं की, ग्राहक न्यायालयाचा हा निर्णय संपूर्ण देशभरात वैध आहे. लोक देशात कुठेही या आदेशचा संदर्भ देऊ शकतात आणि कॅरी बॅगचे पैसे देण्यापासून बचाव करू शकता. 

आदेशामध्ये लिहिलं आहे की,  जरी पिशवी पर्यावरणाला अनुकूल असेल तरीही दुकानदार अतिरिक्त पैसे घेऊ शकत नाही. ग्राहक मंचानं आदेश दिले की, हे स्टोरचं काम आहे की त्यांचं सामान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत कॅरी बॅग उपलब्ध करून द्यावी. 

3 रूपये मागणं बाटा इंडियाच्या अंगाशी 

चंदीगडचे रहिवासी दिनेश प्रसाद रातुरी यांनी ग्राहक मंचाला सांगितले की, बाटा इंडियानं ५ फेब्रुवारीला बाटाच्या स्टोरमधून शोज खरेदी केले. स्टोरनं त्यासाठी माझ्याकडून ४०२ रूपये घेतले. ३९९ रूपयांचे शूज होते आणि ३ रूपये जास्तीचे कॅरी बॅगची किंमत असल्याचं सांगितलं. 

रातुरी यांनी सांगितलं की, जी पेपर बॅग मला देण्यात आली त्या बॅगवर बाटाचं ब्रॅंडिंग सुद्धा होतं. जे बरोबर नाही आहे. ग्राहकाकडून ३ रूपये घेतल्यानं ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. यावर बाटा इंडियानं देखील उत्तर दिलं आहे. बाटा इंडियानुसार, आम्ही त्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकराची कमतरता केली नाही. 

चंदिगडमधल्या सेक्टर २२ डी मधल्या बाटाच्या दुकानातून हे शूज घेतले. कागदी पिशवीसाठी पैसे घेऊन त्यावर बाटानं स्वतःच्या ब्रॅंडची जाहिरात केल्याचंही रातुरी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

यावर ग्राहक मंचानं स्पष्ट केलं की,  पेपर बॅगसाठी पैसे घेणं ही चुकीची सेवा आहे. ग्राहकांनी तुमच्या दुकानातील वस्तू तुमचं उत्पादन खरेदी केल्यास स्टोरची ड्यूटी आहे की तुम्ही त्या ग्राहकाला मोफत पिशवी देणं. ग्राहक मंचानं बाटा इंडियाला ग्राहकांना मोफत पेपर बॅग देण्याचं देखील आदेश दिले आहेत. 

मंचानं बाटा इंडियाला बॅगसाठी ३ रूपये रिफंड करणे आणि कायदेशीर खर्चासाठी १ हजार रूपये ग्राहकाला देण्यासाठी सांगितले आहेत. तर ३००० रूपये ग्राहकाला मानसिक कष्ट झाल्यानं द्यावे. याव्यतिरिक्त ५ हजार रूपये स्टेट कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनसाठी डिपॉझिट करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दुकानदार पिशव्यांचे पैसे मागू शकत नाही, बाटाच्या प्रकरणानंतर निर्णय Description: काही दिवसांपूर्वी बाटा इंडियाविरोधात ग्राहक मंचानं एक मोठा निर्णय घेतला होता. ३ रूपयांच्या बॅगच्या पैशाच्या बदल्यात ९ हजार रूपये देण्याचे आदेश बाटा इंडियाला दिले होते. जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते ? 
Loading...
Loading...
Loading...