IPL मधून दरवर्षी हजारो कोटी कमावणारे बीसीसीआय, मात्र एक रुपयाचाही नाही कर...

BCCI : महसूल विभागाने २०१६-१७ मध्ये बीसीसीआयला तीन कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या. यात विभागाने बीसीसीआयला विचारले होते की ते कोणत्या आधारावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन १२ अ अंतर्गत करात सवलत घेत आहेत. याविरोधात बीसीसीआयने मुंबईत आयटीएटी बेंचकडे दाद मागितली होती. या अपीलावर आयटीएटीने आपला निर्णय दिला आहे. हे नाकारता येत नाही की आयपीएल ही स्पर्धा क्रिकेटचे प्रमोशन करते.

BCCI & IPL
बीसीसीआय आणि आयपीएल 
थोडं पण कामाचं
  • बीसीसीआयला प्राप्तिकर विभागाविरुद्धच्या एका संघर्षात मोठा विजय
  • आयपीएल (IPL)स्पर्धेतून बीसीसीआयला मिळणाऱ्या कमाईवर आता कर भरावा लागणार नाही
  • आयपीएल ही एक क्रिकेटला प्रमोट करणारी स्पर्धा किंवा इव्हेंट असल्याचा फायदा

BCCI Income Tax | नवी दिल्ली: बीसीसीआय (BCCI) ही संस्था जगातील सर्वात ताकदवान क्रिकेट (Cricket)संघटना आहे. बीसीसीआयला प्राप्तिकर विभागाविरुद्धच्या (Income Tax department)एका संघर्षात मोठा विजय मिळाला आहे. इन्कम टॅक्स अपेलेट ट्रिब्युनल म्हणजे आयटीएटीने (ITAT)बीसीसीआयला मोठा दिलासा आहे. या निर्णयानुसार आयपीएल (IPL)स्पर्धेतून बीसीसीआयला मिळणाऱ्या कमाईवर आता कर भरावा लागणार नाही. कारण आयपीएल हा एक स्पोर्ट प्रमोशनल इव्हेंट आहे. आयटीएटीने म्हटले आहे की यात शंका नाही की बीसीसीआय दरवर्षी आयपीएलद्वारे करोडोंची कमाई करते, मात्र हे नाकारता येणार नाही की आयपीएल ही एक क्रिकेटला प्रमोट करणारी स्पर्धा किंवा इव्हेंट आहे. (BCCI earns crores of rupees every year through IPL,  yet no need to pay tax)

महसूल विभागाची बीसीसीआयला नोटिस

महसूल विभागाने २०१६-१७ मध्ये बीसीसीआयला तीन कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या होत्या. यात विभागाने बीसीसीआयला विचारले होते की ते कोणत्या आधारावर इन्कम टॅक्सच्या सेक्शन १२ अ अंतर्गत करात सवलत घेत आहेत. याविरोधात बीसीसीआयने मुंबईत आयटीएटी बेंचकडे दाद मागितली होती. या अपीलावर आयटीएटीने आपला निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या वेळी आयटीएटीने म्हटले की बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे डिझाइन या पद्धतीने केले आहे की त्यामुळे ही स्पर्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. लोकप्रियता असल्यामुळे प्रायोजकदेखील मिळतात. त्यातून करोडोंची कमाई होते. अर्थात हे नाकारता येत नाही की ही स्पर्धा क्रिकेटचे प्रमोशन करते.

प्राप्तिकर विभागाने आयपीएलला मनोरंजनाचे काम म्हटले

प्राप्तिकर विभागाने आयपीएलला एक मनोरंजनाची स्पर्धा म्हटले आहे. त्यामुळे यातून होणाऱ्या कमाईवर कर देणे आवश्यक आहे. आयपीएलमध्ये जे काही होते ते ट्रेड, कॉमर्स आणि व्यवसायाशी निगडीत आहे. आयटीएटीच्या या निर्णयाचा पब्लिक ट्रस्टच्या कारभारावर गंभीर परिणाम होणार आहे. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आता पब्लिक ट्रस्टदेखील हाच मार्ग अवलंबतील. अर्थात प्रायव्हेट ट्रस्टला हा निर्णय लागू होणार नाही. 

आयपीएलची लोकप्रियता आणि जबरदस्त कमाई

आयपीएल ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतातच नव्हे तर जगभरात अत्यंत लोकप्रिय स्पर्धा ठरली आहे. याकडे दरवर्षी चाहते डोळे लावून बसतात. लोकप्रियतेमुळे या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात प्रायोजक मिळतात. शिवाय ते प्रचंड मोठ्या रकमा बीसीसीआयला देतात. यातून दरवर्षी बीसीसीआय कोट्यवधी रुपयांची कमाई करते. खेळाडूंना देखील यातून गडगंज पैसा मिळतो. आयपीएलमुळे क्रिकेट, व्यापार, व्यवसाय यांचा जबरदस्त मिलाफ साधला गेला आहे. शिवाय आयपीएलमध्ये दरवर्षी काहीतरी नाविन्य आणण्यात येते. त्यामुळे चाहत्यांचा यामधील रस टिकून राहतो.

बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. इतकेच नाही जगातील सर्वात श्रीमंत खेळ संघटनांपैकीदेखील एक आहे. बीसीसीआयची ताकद एवढी आहे की आयसीसीला देखील बीसीसीआयच्या कलानेच चालावे लागते. क्रिकेट आणि आर्थिक बाबींची जबरदस्त सांगड बीसीसीआयने घातली आहे. त्याचा फायदा मंडळाला आणि खेळाडूंना होतो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी