करोडपती बनण्याचं स्वप्न होईल पूर्ण ; फक्त साडे सात हजारांची गुंतवणूक देईल करोडो रुपये

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 19, 2021 | 14:09 IST

पीपीएफ हे दीर्घकाळीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. यात गुंतवूक करुन तुम्ही भविष्यातील गोष्टी पूर्ण करण्यासाठी हा पैसा कामी येतो.

Becoming a millionaire is easy invest  Only seven and a half thousand get crores of rupees
करोडपती बनण्याचं स्वप्न होईल पूर्ण   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ उत्तम पर्याय
  • महिन्याला १२,५०० रुपयांची गुंतणूक देईल करोडो रुपये
  • निवृत्त होण्याआधी करोडपती होण्याचं स्वप्न होईल पूर्ण

नवी दिल्ली : पीपीएफ हे दीर्घकाळीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. यात गुंतवूक करुन तुम्ही भविष्यातील  गोष्टी पूर्ण करण्यासाठी हा पैसा कामी येतो. भविष्यात जर काही मोठी समस्या आली किंवा दवाखान्याचा खर्च आला तर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशातून कर्ज काढू शकतात. इतकेच काय पीपीएफ मध्ये गुंतवणूक करुन तुम्ही निवृत्त होण्याच्या आधीच कोरडपती होऊ शकतात. पीपीएफच्या गुंतवणुकीतून  आपण कोरडपती कसं होणार याविषयी आज जाणून घेणार आहोत...

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) म्हणजेच पीपीएफ (PPF) हे भारतातील सर्वात जुनं आणि लोकप्रिय बचतीचा पर्याय आहे. पीपीएफ हे छोट्या स्किममधील एक आहे. यात गुंतवणूक केल्यास आपल्याला चांगले व्याज मिळते. या पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाकाठी दीड लाख रुपये जमा करू शकतात. म्हणजेच प्रत्येक महिन्याला १२ हजार ५०० रुपये जमा करावे लागतील. दरम्यान सरकार यावर ७.१ टक्के वर्षाला व्याज देत असते. यात तुम्ही साधरण १५ वर्षापर्यंत गुंतवणूक करु शकतात. या हिशोबाने  तुम्ही जर महिन्याला १२ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुमची जमा झालेली रक्कम ही १५ वर्षात ४० लाख ६८ हजार २०९  रुपये होईल. यातील एकूण  गुंतवणूक २२.५ लाख रुपये आणि व्याज   १८ लाख १८ हजार २०९ रुपये आहे. 

कसे होणार करोडपती  (How to become a millionaire)

जर तुमचं वय ३० वर्ष असेल तर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर दर महिन्याला पीपीएफमध्ये १२ हजार ५०० रुपये १५ वर्षापर्यंत जमा करत असाल तर तुमच्या कडे ४० लाख ६८ हजार २०९ रुपये येतील. आता  पीपीएफमधील जमा झालेले पैसे काढण्याऐवजी त्याला ५ - ५ वर्षासाठी गुंतवले तर तुमचे पैसे वाढतील. १५ वर्षानंतर पाच वर्ष परत गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक २० वर्षानंतर ६६ लाख ५८ हजार २८८ रुपये होईल. त्यात तुम्ही परत ५ वर्षासाठी पुढे गुंतवणूक अजून चालू ठेवली तर म्हणजेच २५ वर्ष गुंतवणूक केली तर तुमच्या खात्यात १, कोटी ३ लाख ८ हजार ०१५  रुपये जमा होतील.

निवृत्त होण्याआधी व्हा करोडपती (Become a millionaire before you retire)

जर तुम्ही १० हजार रुपयांऐवजी ७ हजार ५०० रुपये पीपीएपमध्ये जमा कराल तर तुमच्या वयाच्या ५५ वर्षापर्यंत तुम्ही करोडपती व्हाल. परंतु तुम्हाला वयाच्या २० व्या वर्षी गुंतवणूक सुरू करावी लागेल. ७५०० रुपयांवर पीपीएपमध्ये १५ वर्षापर्यंत ७.१ टक्के व्याज मिळवाल तर  तुमची जमा झालेली रक्कम ही २४ लाख ४० हजार ९२६ रुपये होईल. त्यानंतर पीपीएफ खात्यात परत ५ वर्ष अधिक गुंतवणूक केली तर तुमच्या खात्यात  एकूण वीस वर्षात ३९ लाख ९४ हजार ९७३ रुपये होतील.

जर तुम्ही अजून ५ वर्ष गुंतवणूक अधिक केली तर पूर्ण २५ वर्ष गुंतवणूक केली तर तुमच्या खात्यात ६१ लाख ८४ हजार ८०९ रुपये येतील. त्यात जर परत गुंतवणुकीचा कालावधी वाढवला तर गुंतवणूक तुम्ही ३०  वर्षापर्यंत केली तर तुमच्या खात्यात ९२लाख ७० हजार ८०९ रुपये जमा होतील. त्यानंतर पाच वर्ष परत गुंतवणूक केली तर म्हणजे ३५ वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुमच्या खात्यात १कोटी  ३६ लाख १८ हजार ७१४ रुपये जमा होतील. म्हणजेच वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत तुम्ही कोरडपती होऊन तुमच्याकडे जवळपास सव्वा कोटी रुपये असतील 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी