Best Interest Rates on small finance banks | या स्मॉल फायनान्स बॅंकांमध्ये बचत खात्यावर मिळतेय ७ टक्के व्याज

Best Interest Rates on small finance banks: या स्मॉल फायनान्स बॅंका खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या तुलनेत बचत खात्यावर अतिरिक्त व्याजदर देत आहेत. अधिकाधिक नवीन रिटेल ग्राहकांना आकर्षित करणे हा यामागचा स्मॉल फायनान्स बॅंकांचा मुख्य हेतू आहे.

Best Interest Rates on small finance banks
बचत खात्यावर अधिक व्याज देणाऱ्या स्मॉल फायनान्स बॅंका 
थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात बॅंकांकडून कपात
  • काही स्मॉल फायनान्स बॅंका देताेत बचत खात्यावर अधिक व्याज
  • अधिकाधिक नवीन रिटेल ग्राहकांना आकर्षित करणे हा यामागचा स्मॉल फायनान्स बॅंकांचा मुख्य हेतू

Best Interest Rates on small finance banks: सर्वसाधारणपणे बहुतांश नागरिक पैसे साठवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी बचत खाते (Savings Account) सुरू करतात. अतिरिक्त पैसे बचत खात्यात ठेवता येतात आणि अचानक पैशांची गरज भासल्यास लगेच ते काढतादेखील येतात. बचत खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशांवर व्याजदेखील (Interest rate) मिळते. अलीकडच्या काळात बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात बॅंकांकडून कपात करण्यात येते आहे. मात्र अशा काही स्मॉल फायनान्स बॅंका (small finance banks)आहेत ज्या बचत खात्यावर अधिक व्याज देत आहेत. या बॅंकाविषयी जाणून घेऊया. (Best Interest Rates on Savings Account: These small Finance Banks are giving 7 % interest rate on savings Account)

या स्मॉल फायनान्स बॅंका खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या तुलनेत बचत खात्यावर अतिरिक्त व्याजदर देत आहेत. अधिकाधिक नवीन रिटेल ग्राहकांना आकर्षित करणे हा यामागचा स्मॉल फायनान्स बॅंकांचा मुख्य हेतू आहे. बॅंकेत बचत खाते सुरू करताना बॅंकेचा ट्रॅक रेकॉर्ड, सेवेचा रेकॉर्ड, बॅंकेच्या शाखांचे जाळे आणि एटीएम सेवा इत्यादी बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. बचत खात्यावर मिळणे जास्तीचे व्याज हा ग्राहकांना मिळणारा बोनस ठरतो. वेगवेगळ्या स्मॉल फायनान्स बॅंका बचत खात्यावर किती व्याजदर देत आहेत ते पाहूया.

१. AU स्मॉल फायनान्स बॅंक

AU स्मॉल फायनान्स बॅंकेत बचत खात्यावर ७ टक्के व्याजदर देते आहे. या स्मॉल फायनान्स बॅंकेत बचत खाते सुरू करण्यासाठी मासिक २,००० रुपयांपासून ते ५,००० रुपयांपर्यतचा सरासरी बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता असते.

२. इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंक

इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंकेत बचत खात्यावर ७ टक्क्यांपर्यत व्याजदर दिला जातो आहे. यामध्ये सरासरी मासिक बॅलन्सची गरज २,५०० रुपये ते १०,००० रुपये आहे. 

३. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंक

ही स्मॉल फायनान्स बॅंक बचत खात्यावर ग्राहकांना ७ टक्क्यापर्यतचे व्याज देते आहे

४. सुर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक

सुर्योदय स्मॉल फायनान्स बॅंकेत बचत खात्यावर ग्राहकांना ६.२५ टक्क्यांपर्यत व्याज मिळेल. यामध्ये सरासरी मासिक बॅलन्सची आवश्यकता २,००० रुपये आहे.

या यादीमध्ये फक्त बीएसई लिस्टेड स्मॉल फायनान्स बॅंकांच्याच बचत खात्यावरील व्याजदराचा आढावा घेण्यात आला आहे. ज्या बॅंकांच्या वेबसाइटवर त्यांच्या व्याजदराची माहिती देण्यात आलेली नाही त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. शिवाय बॅंका निवडताना नियमित बचत खात्यावर किमान बॅलन्स राखण्याच्या मुद्द्यालाही लक्षात घेतले आहे. बॅंकेत बचत खाते सुरू करताना बॅंकेचा ट्रॅक रेकॉर्ड, सेवेचा रेकॉर्ड, बॅंकेच्या शाखांचे जाळे आणि एटीएम सेवा इत्यादी बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बॅंकांचादेखील वेगाने विस्तार होतो आहे. आकर्षक व्याजदर आणि सेवा यामुळे स्मॉल फायनान्स बॅंकांचा व्यवसाय विस्तारत चालला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी