Petrol Pump Fraud : सावधान, पेट्रोल पंपावर सुरू आहे फसवणूक, नुकसान टाळण्यासाठी हा आहे उपाय

Beware From Petrol Pump Fraud, Beware From Petrol Pump Scam, Here Is The Solution To Avoid Loss : काही पेट्रोल पंपांवर वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरताना फसवणूक करून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. जाणून घ्या पेट्रोल पंपावर कशा प्रकारे होते फसवणूक आणि ही फसवणूक टाळण्याचे उपाय...

Beware From Petrol Pump Fraud
पेट्रोल पंपावरची फसवणूक टाळण्याचे उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल पंपावरची फसवणूक टाळण्याचे उपाय
  • जाणून घ्या पेट्रोल पंपावर कशा प्रकारे होते फसवणूक आणि ही फसवणूक टाळण्याचे उपाय...
  • काय सांगतो ग्राहक संरक्षण कायदा १९८६?

Beware From Petrol Pump Fraud, Beware From Petrol Pump Scam, Here Is The Solution To Avoid Loss : वाहनांची संख्या वाढत आहे. बहुसंख्य वाहने आजही पेट्रोल किंवा डिझेल इंधन म्हणून वापरतात. आंतरराष्ट्रीय कारणांमुळे सध्या तेलाचे दर वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तर दररोज बदल होत असतात. या परिस्थितीचा काही पेट्रोल पंपांवर गैरफायदा घेतला जात आहे. वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरताना फसवणूक करून ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. जाणून घ्या पेट्रोल पंपावर कशा प्रकारे होते फसवणूक आणि ही फसवणूक टाळण्याचे उपाय... । काम-धंदा

  1. वाहनात इंधन भरण्याआधी मीटर रीडिंग झिरो आहे की नाही ते तपासा.
  2. वाहनात इंधन भरले जात असताना आपले लक्ष मीटर रीडिंगवर राहू द्या. मीटर दिसत नसेल तर वाहनातून बाहेर येऊन थोडे पुढे जा आणि मीटरवर लक्ष ठेवा. मीटरवर लक्ष ठेवत असतानाच अधूनमधून फ्युएल नोझलवर लक्ष ठेवा. यामुळे वाहनात भरले जाणारे इंधन आणि मीटर रीडिंग यात तफावत आहे की नाही हे तपासता येईल.
  3. आपल्याला जेवढे इंधन भरून घ्यायचे आहे तेवढे मीटर रीडिंगमध्ये दिसताच इंधन भरून घेणे थांबवा. 
  4. भेसळीचा संशय आला तर फिल्टर पेपर मागवा. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार सर्व पेट्रोल पंपांवर फिल्टर पेपरचा स्टॉक ठेवणे आवश्यक आहे. तसेच कुठल्याही ग्राहकाला अशी तपासणी करण्याचा अधिकार आहे. टेस्ट करण्यासाठी तुम्हाला पेपरवर इंधनाचे (पेट्रोल वा डिझेल) थोडे थेंब टाकावे लागतात. डाग न ठेवता इंधन उडून गेले तर ते शुद्ध पेट्रोल किंवा शुद्ध डिझेल आहे असे समजावे. या चाचणीलाच फिल्टर पेपर टेस्ट असे म्हणतात. जर फिल्टर पेपर टेस्टमध्ये डाग राहिले तर इंधनात भेसळ असल्याची तक्रार करू शकता. 
  5. काही वेळा मीटरचे आकडे आणि प्रत्यक्षात होत असलेला इंधनाचा पुरवठा (पेट्रोल वा डिझेल) यात तफावत असते. संशय आला तर पेट्रोल पंपावरील पाच लिटरच्या जारमध्ये 5 लिटर तेल भरून संशय दूर करून घेऊ शकता. पण ही चाचणी करताना जार 5 लिटरचाच आहे न याची खात्री करून घ्या. 
  6. फिल्टर पेपर टेस्ट आणि जार टेस्ट नंतरही आपले समाधान झाले नाही, मनात संशय असेल तर इंधनाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे कॉल करून तक्रार करता येते. इंडियन ऑईलसाठी कस्टमर केअर नंबर 1800 2333 555 आहे. भारत पेट्रोलियमसाठी कस्टमर केअर नंबर 1800 22 4344 आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी