Loan Fraud : नवी दिल्ली : आर्थिक अडचणीमुळे किंवा संकटामुळे अनेकांना कर्ज घेण्याची वेळ येते. सहसा कर्ज घेण्यासाठी बॅंकेत अर्ज केला जातो. यात विविध प्रकारची कर्जे (Loan)येतात. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, कार कर्ज, दुचाकी कर्ज, शैक्षणिक कर्ज अनेक प्रकार आहेत. आधी फक्त बॅंकांचाच पर्याय असायचा. मात्र अलीकडच्या काळात अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ऑनलाइन स्वरुपातदेखील कर्ज उपलब्ध होते. अनेक बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्या, लोन अॅप्स कर्ज (Loan Apps) उपलब्ध करून देतात. मात्र याचाच फायदा उलचत गुन्हेगार अनेक फ्रॉड (Loan Fraud) करत आहेत. गुन्हेगार कर्जाच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करून त्यांचे संपूर्ण बँक खाते (Bank Account) रिकामे करत असल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत. त्यामुळे तुम्हाला कर्ज हवे असो किंवा नसो तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमचे बॅंक खाते रिकामे व्हायला वेळ लागणार नाही.
(Beware of fkae loan which is used for online fraud)
अधिक वाचा : Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, लवकरच ईडी मालमत्तेवर आणणार टाच
वेब लिंकवर क्लिक नको
तुम्हाला अनेकदा दिसून आले असेल की तुमच्या मोबाईल नंबरवर नको असलेले मेसेज येतात. अशा मेसेजमध्ये तुम्हाला कर्जाची ऑफर दिलेली असते आणि त्यासाठी एक लिंक देखील दिलेली असते. या लिंकवर क्लिक करण्यास सांगितलेले असते. मात्र इथेच खरी खोच आहे. तुम्ही कोणत्याही मेसेजमध्ये येणाऱ्या वेब लिंकवर क्लिक करू नका. कारण यातूनच गुन्हेगार तुमची वैयक्तिक माहिती, बॅंक खात्याची माहिती चोरतात आणि मग तुमचे बॅंक खाते रिकामे होते. याचबरोबर इंटरनेटवर सर्च करत असताना एखादी नको असलेली वेब लिंक तुमच्या समोर आली तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. या लिंक म्हणजे फसवणुकीचे जाळे असते. तुमच्या बॅंक खात्यापर्यत पोचण्याचा हा मार्ग असतो.
अधिक वाचा : Eknath Shinde : राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान
ई-मेलचा सापळा
अनेकदा गुन्हेगार बनावट ईमेल पाठवून लोकांना फसवतात. हे ईमेल अगदी बेमालूमपणे तयार केलेले असतात. या ई-मेलच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडतात. ते असे ई-मेल लोकांना पाठवतात, ते पाहून असे वाटते की ते खरोखर बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून पाठवले आहेत. मात्र अनेकदा ते बनावटदेखील असतात. यातसुद्धा लिंक दिलेल्या असतात. त्यामुळे संपूर्ण चौकशी होईपर्यंत कोणत्याही कर्जाशी संबंधित ई-मेलवर विश्वास ठेवू नये. त्यातील सूचनांचे पालन करू नये किंवा लिंकवर क्लिक करू नये.
अधिक वाचा : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात- उद्धव ठाकरे
फेक वेबसाइट
अनेकदा फसवणूक करताना बनावट बेवसाइटचे देखील जाळे पसरले जाते. वेबसाइट असली म्हणजे ती संस्था किंवा बाब खरी किंवा योग्य असणार असे प्रत्येकाला वाटते. गुन्हेगार आता यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. बँकांच्या बनावट वेबसाइट्स तयार करून फसवणूक केली जाते आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी ते खरे आहे की खोटे हे देखील तपासा. नाहीतर कर्ज मिळण्याऐवजी तुमचे बॅंक खातेच रिकामे होईल.