धोकेबाजांपासून राहा सावध! आपल्या फोनवर बनावट मेसेज तर येत नाहीत?

काम-धंदा
Updated Jan 25, 2021 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या फोनवर कधीकधी आपल्याला मोहात पाडणारे मेसेज येतात. लाखो, करोडो रुपये जिंकल्याचे यात सांगितलेले असते. आपल्या बँका आपल्याला याबाबत सतर्क राहण्यास आणि या धोकेबाजांपासून सावध राहण्यास सांगत आहेत.

Online transactions and frauds
धोकेबाजांपासून राहा सावध! आपल्या फोनवर बनावट मेसेज तर येत नाहीत? रिकामे होऊ शकते आपले खाते  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • आयसीआयसीआय बँकेने ईमेलमधून दिल्या तीन टिप्स
 • काय आहेत एसबीआयने ग्राहकांना दिलेल्या सूचना?
 • फसवणूक झाल्यास कशी कराल तक्रार दाखल?

मुंबई: डिजिटल देवाणघेवाण (Digital transactions) आणि बँका (banks), आर्थिक संस्था (financial organizations) आणि इतर स्रोतांकडून मिळणाऱ्या सेवांची (services) बरीच मोठी आहे. यासोबतच देशात ऑनलाईन फसवणुकीचे (online frauds) प्रकारही वाढत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आणि कोणत्याही कोणत्याही दुकानात किंवा ऑनलाईन पेमेंट (online payment) करताना सावधगिरी (awareness) बाळगण्यास सांगितले जात आहे. याचा अर्थ ऑनलाईन व्यवहार सेवा वापरताना सावध राहा. कारण आपल्यावर धोकेबाजांचीही (fraudsters) नजर असू शकते. जर खातेधारक सावध आणि जागरूक असेल तर या धोकेबाजीपासून बऱ्याच अंशी वाचता येऊ शकेल.

आयसीआयसीआय बँकेने ईमेलमधून दिल्या तीन टिप्स

 1. BP-BeanYTM सेंडर: आपले KYC सफलतापूर्वक अपडेट झाले आहे. आता आपण 1300 रुपयांच्या कॅशबॅकसाठी पात्र आहात. आपल्या कॅशबॅकसाठी दावा करण्यासाठी इथे भेट द्या- http://311agtr. आयसीआयसीआय बँकेचे म्हणणे आहे- आपले KYC अपडेट करण्यासाठी कोणतीही रक्कम इनाम किंवा बक्षीस म्हणून दिली जात नाही. यामुळे असे मेसेज खोटे असतात हे स्पष्ट होते. या मेसेजमध्ये दिली गेलेली लिंकसुद्धा खोटीच असते.
 2. Y-Cash पाठवणारे: अभिनंदन, आपल्या खात्यात 3,30,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. कृपया आपले तपशील http://i2urewards.cc/33 इथे भरा. ICICI बँकेने म्हटले आहे की कोणतीही कंपनी कधीही इतकी मोठी रक्कम रोख देत नाही आणि ही लिंकही खोटीच असते.
 3. 8726112@vz.comवरून पाठवणारे: आपले आयटी रीफंड चालू करण्यात आला आहे. यासाठी दावा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यासाठी Http://itr.trn./toref या संकेतस्थळावर जा. या मेसेजमध्ये  ICICI बँकेचे म्हणणे आहे की हा मेसेज पाठवणाऱ्या संशयास्पद आयडीकडे लक्ष द्या.  

याआधी भारतीय स्टेट बँकेनेही आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचा आणि ऑनलाईन असताना कोणत्याही भ्रामक मेसेजच्या जाळ्यात अडकू नका असा इशारा दिला होता. जाणून घ्या भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने उचललेली पावले-

 1. एटीएम किंवा पीओएस मशीनवर एसबीआई एटीएम कार्ड वापरताना हाताने कीपॅड कव्हर करा.
 2. आपला SBI पिन किंवा कार्डाचे तपशील कोणालाही सांगू नका.
 3. आपल्या कार्डावर कधीही आपला एटीएम पिन लिहू नका.
 4. आपल्या एटीएम पिन किंवा कार्डाच्या तपशीलांबद्दल कोणताही मेसेज, ईमेल किंवा फोनला उत्तर देऊ नका.
 5. आपला वाढदिवस, फोन किंवा खात्याचा क्रमांक आपला पिन म्हणून वापरू नका.
 6. व्यवहाराच्या रिसीट सुरक्षित पद्धतीने नष्ट करा.
 7. आपला व्यवहार चालू करण्यापूर्वी स्पाय कॅमेरा तपासा.
 8. एटीएम किंवा पीओएस मशीन वापरताना कीपॅड मॅनिप्युलेशन, हीट मॅपिंग आणि शोल्डर सर्फिंगपासून सावध राहा.
 9. SBI ऑनलाईन व्यवहारांच्या अलर्टसाठी आवर्जून साईन अप करा. 

राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर कशी दाखल कराल तक्रार?

सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याला सायबर क्राईम पोर्टल https://cybercrime.gov.in/वर जा आणि 'इतर सायबर क्राईम गुन्हा नोंदवा' यावर क्लिक कला आणि तक्रार दाखल करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्वरित कारवाईसाठी तक्रार दाखल करण्याची वेळ आणि तपशील भरणे गरजेचे आहे. आणीबाणीच्या परिस्थिती स्थानिक पोलिसांना संपर्क करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे. यासाठीचा क्रमांक 100 आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी