BH-series 'भारत' सीरिजची नंबरप्लेट भारतातील सर्व राज्यांत वैध ठरणार, महाराष्ट्रात उपलब्ध

भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वैध असलेली 'भारत' अर्थात 'BH' (बीएच) सीरिजची नंबरप्लेट आता महाराष्ट्रातही उपलब्ध आहे. BH-series: One number plate valid in all states of India... now available in Maharashtra

BH-series: One number plate valid in all states of India... now available in Maharashtra
'भारत' सीरिजची नंबरप्लेट भारतातील सर्व राज्यांत वैध ठरणार, महाराष्ट्रात उपलब्ध 
थोडं पण कामाचं
  • 'भारत' सीरिजची नंबरप्लेट भारतातील सर्व राज्यांत वैध ठरणार, महाराष्ट्रात उपलब्ध
  • 'भारत' सीरिज अंतर्गत वाहनाची नोंदणी करुन नंबर मिळवण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन
  • कोणत्याही राज्यात 'भारत' सीरिज अंतर्गत नोंदणी केलेले वाहन इतर राज्यांमध्येही वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन मुक्तसंचार करू शकेल

BH-series नवी दिल्ली: भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वैध असलेली 'भारत' अर्थात 'BH' (बीएच) सीरिजची नंबरप्लेट आता महाराष्ट्रातही उपलब्ध आहे. 'भारत' सीरिज अंतर्गत वाहनाची नोंदणी करुन नंबर मिळवण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. यात ज्या राज्यातून नोंदणी केली जाईल तिथे कर भरावा लागेल. नंतर परराज्यात स्थलांतर केल्यास संबंधित राज्यात कर भरावा लागेल. या व्यवस्थेमुळे देशातील कोणत्याही राज्यात 'भारत' सीरिज अंतर्गत नोंदणी केलेले वाहन इतर राज्यांमध्येही वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन मुक्तसंचार करू शकेल. स्थलांतर केले म्हणून वाहनाची नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. सरकारी आणि खासगी सेवेतील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वारंवार बदली होते त्यांची 'भारत' सीरिजमुळे मोठी सोय होईल. BH-series: One number plate valid in all states of India... now available in Maharashtra

मोटार वाहन कायदा १९८८ नुसार, एका राज्यातील नोंदणीकृत वाहन १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दुसर्‍या राज्यात ठेवल्यास त्याची नवीन नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ होती. शिवाय ज्या राज्यात आधी नोंदणी केली आहे तिथून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात वेळ जायचा. हा सर्व त्रास वाचावा यासाठी 'भारत' अर्थात 'BH' (बीएच) सीरिज अंतर्गत वाहनांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच चार किंवा जास्त राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या वाहनांची 'भारत' अर्थात 'BH' (बीएच) सीरिज अंतर्गत नोंदणी करता येईल. महाराष्ट्रातून ऑनलाइन पद्धतीने 'BH' (बीएच) सीरिज अंतर्गत नोंदणी करणाऱ्या वाहनांकरिता नंबरप्लेटचे स्वरुप YY BH असे असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी