अबब! नोकरीत रुजू होताच मिळेल बीएमडब्ल्यू सुपर बाईक आणि दुबईत वर्ल्ड कप पाहण्याची संधी, या कंपनीच्या ऑफर

BharatPe: उद्योग-व्यवसायातील चांगल्या टॅलेंटेड कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतपे नव्या कर्मचाऱ्यांना दोन प्रकारच्या पॅकेजची ऑफर देते आहे. यातील पहिले पॅकेज आहे 'बाइक पॅकेज' आणि दुसरे आहे 'गॅजेट पॅकेज

BharatPe Bike & Gadget Packages for new employees
भारतपेचे नव्या कर्मचाऱ्यांसाठी बाइक आणि गॅजेट पॅकेजेस 

थोडं पण कामाचं

  • 'भारतपे'कडून नव्या कर्मचाऱ्यांना बीएमडब्ल्यू बाईक, अॅपल आयपॅड प्रो , सॅमसंग गॅलक्सी वॉच अशा अनेक भेटवस्तू
  • चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्च २०२२पर्यत कंपनी आपल्या टीमची ताकद आणि क्षमता तिप्पट करण्यासाठी भारतपे आपल्या टीममध्ये करणार नवीन कर्मचाऱ्यांचा समावेश
  • कंपनी कर्मचाऱ्यांना दुबईमध्ये वर्ल्ड कपचे सामने दाखवणार

नवी दिल्ली: पॉईंट ऑफ सेल म्हणजे पीओएस (POS)या श्रेणीतील भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या 'भारतपे' (BharatPe)या कंपनीने आपल्या नव्या कर्मचाऱ्यांसाठी बंपर जॉइनिंग पर्कची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत 'भारतपे' नव्या कर्मचाऱ्यांना बीएमडब्ल्यू बाईक (BMW Super Bike), अॅपल आयपॅड प्रो ( Apple iPad Pro) , सॅमसंग गॅलक्सी वॉच (Samsung Galaxy Watch)अशा अनेक भेटवस्तू देते आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी२० वर्ल्ड कपसाठी नवीन कर्मचाऱ्यांना दुबई टूरवरदेखील भारतपे घेऊन जाणार आहे. (BharatPe offering BMW Super bike, Apple Gadgets & T20 World Cup Tour to newly joining employees)

भारतपे करते आहे व्यवसायाचा विस्तार

भारतपे या कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करते आहे. या योजनेअंतर्गत कंपनी आगामी काळात मर्चंट आणि कन्झ्युमर लेंडिंगच्या क्षेत्रात काही नवीन सेवा, उत्पादने बाजारात आणते आहे. यासाठी कंपनीला एका नव्या टीमची आवश्यकता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच मार्च २०२२पर्यत कंपनी आपल्या टीमची ताकद आणि क्षमता तिप्पट करू इच्छिते. यासाठी भारतपे आपल्या टीममध्ये १०० नव्या कर्मचाऱ्यांचा समावेश करणार आहे. त्यामुळे नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने विविध पॅकेजची ऑफर दिली आहे.

बाइक पॅकेजमध्ये ५ सुपर बाइकमधून पर्याय निवडण्याची ऑफर

उद्योग-व्यवसायातील चांगल्या टॅलेंटेड कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतपे नव्या कर्मचाऱ्यांना दोन प्रकारच्या पॅकेजची ऑफर देते आहे. यातील पहिले पॅकेज आहे 'बाइक पॅकेज' (Bike Package) आणि दुसरे आहे 'गॅजेट पॅकेज' (Gadget Package). बाइक पॅकेजमध्ये भारतपे नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५ सुपर बाइकचे पर्याय देते आहे. यामध्ये BMW G310R, Jawa Parek, KTM Duke 390, KTM RC 390 आणि रॉयल एनफील्ड हिमालयन यांचा पर्याय भारतपे कडून देण्यात येतो आहे.

गॅझेट पॅकेजमध्ये मिळतील वेगवेगळे गॅझेट

भारतपे गॅझेट पॅकेजअंतर्गत नव्या कर्मचाऱ्यांना Apple iPad Pro (with Pencil), Bose Headphone, Herman carden speakers, Smasung Galaxy Watch, WFH Desk and Chair आणि सायकलिंगसाठी Firefox Typhoon 27.5 D ही सायकल देते आहे.

वर्ल्ड कप दाखवण्यासाठी कंपनी घेऊन जाणार दुबईला

ऑक्टोबर महिन्यापासून आयसीसी टी२० क्रिकेट वर्ल्ड कपची सुरूवात होते आहे. यावेळेस टी२० वर्ल्ड कप दुबईमध्ये खेळला जाणार आहे. भारतपे कडून आपल्या टीमच्या सर्व कर्मचाऱ्यांना दुबई टूर दिला जाणार आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना दुबईमध्ये वर्ल्ड कपचे सामने दाखवणार आहे. 

८ महिन्यांआधीच लागू केले अप्रेजल

याशिवाय भारतपे कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठीच्या अप्रेजल प्रक्रियेची घोषणा ८ महिने आधीच केली आहे. जे अप्रेजल २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांना मिळाले असते त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना आताच देण्यात आला आहे. याला १ जुलै २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. अप्रेजलची प्रक्रिया दोन भागात विभागण्यात आली आहे. यातील एक हिश्यामध्ये एप्म्लॉयी स्टॉक ऑप्शन म्हणजे ESOP चा लाभदेखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात ट्रान्झॅक्शन प्रोसेस्ड व्हॅल्यूला ६ अब्ज डॉलरपर्यत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीने आतापर्यत इक्विटी आणि डेच माध्यमातून २१०० कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी