5G Services : खूशखबर! एअरटेल या महिन्यात सुरू करणार 5G सेवा, 2024 पर्यंत संपूर्ण देशभरात उपलब्ध...एअरटेलच्या नफ्यात दणदणीत वाढ

Airtel 5G services : तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित 5G सेवा (5G Services) अखेर सुरू होते आहे. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली भारती एअरटेल (Bharti Airtel) या महिन्यात आपली 5G सेवा सुरू करणार आहे. तर मार्च 2024 पर्यत एअरटेल भारतातील सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागापर्यत आपली 5G सेवा पुरवणार आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता अधिक वेगवान आणि आधुनिक सुविधा मिळणार आहे.

Airtel 5G Services
एअरटेलची 5G सेवा 
थोडं पण कामाचं
  • भारती एअरटेल (Bharti Airtel) या महिन्यात आपली 5G सेवा सुरू करणार
  • मार्च 2024 पर्यंत एअरटेल देशातील प्रत्येक शहर आणि प्रमुख ग्रामीण भागात 5G सेवा पुरवणार
  • जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित नफ्यात पाच पटीने वाढ नोंदवली असून कंपनीचा नफा 1,607 कोटी रुपयांवर पोचला

Airtel 5G Services update : नवी दिल्ली : तुम्ही जर एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित 5G सेवा (5G Services) अखेर सुरू होते आहे. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली भारती एअरटेल (Bharti Airtel) या महिन्यात आपली 5G सेवा सुरू करणार आहे. तर मार्च 2024 पर्यत एअरटेल भारतातील सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागापर्यत आपली 5G सेवा पुरवणार आहे. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांना आता अधिक वेगवान आणि आधुनिक सुविधा मिळणार आहे. एअरटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल म्हणाले की, भारतात मोबाईल सेवांची किंमत खूपच कमी आहे आणि ती वाढण्याची गरज आहे. (Bharti Airtel to start 5G services this month)

अधिक वाचा : कॉमनवेल्थमध्ये मेडल जिंकणाऱ्या या खेळाडूला मोदी म्हणाले 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'

लवकरच सर्व देशभरात सेवा पुरवणार

5G सेवांबद्दल बोलताना भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल पुढे म्हणाले की, "आम्ही ऑगस्टपासून 5G लाँच करण्याचा आणि लवकरच संपूर्ण देशभरात ही सेवा पुरवण्याचा आमचा मानस आहे. आम्हाला विश्वास आहे की मार्च 2024 पर्यंत आम्ही प्रत्येक शहर आणि प्रमुख ग्रामीण भाग 5G सेवेद्वारे कव्हर करू शकू. "भारतातील 5,000 शहरांसाठी तपशीलवार नेटवर्कद्वारे सेवा पुरवण्याची योजना पूर्णपणे तयार आहे. हे आमच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पावलांपैकी एक असेल," असेही पुढे विट्टल यांनी कंपनीच्या महसूलासंदर्भात बोलताना  सांगितले.

5G स्पेक्ट्रम लिलाव

भारती एअरटेलने नुकत्याच पार पडलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 3.5 GHz आणि 26 GHz बँड्सचे संपूर्ण भारतातील अधिकार सुरक्षित करून 19,867.8 MHz फ्रिक्वेन्सी मिळवल्या. एअरटेल या लिलावात एकूण 43,040 कोटी रुपयांच्या बोलीद्वारे लघु आणि मध्यम-बँड स्पेक्ट्रममधील रेडिओवेव्हची निवड केली. विट्टल म्हणाले की, कंपनीचा भांडवली खर्च सध्याच्या पातळीच्या आसपास राहील आणि आम्ही 700 मेगाहर्ट्झ बँडमधील प्रीमियम स्पेक्ट्रम खरेदी करण्याची गरज कमी केली. या बॅंडसाठी दूरसंचार कंपन्यांना इतर बॅंडच्या तुलनेत सध्या असलेल्या टॉवरपेक्षा कमी संख्येने टॉवर लागतात. 

"आमच्या स्पर्धकांकडे इतका मोठा मध्यम-बँड स्पेक्ट्रम नाही. लक्षात ठेवा की जर आमच्याकडे मौल्यवान मिड-बँड स्पेक्ट्रमचा इतका मोठा भाग नसता तर आमच्यासमोर महागडा 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. "आणि एकदा आम्ही ते विकत घेतले असते तर आम्हाला या बँडवर मोठे पॉवर गझलिंग रेडिओ तैनात करावे लागले असते. यामुळे केवळ खर्चच वाढला नसता, तर त्यामुळे अधिक कार्बन उत्सर्जनही झाले असते," असे विट्टल म्हणाले. ते म्हणाले की कंपनीकडे आधीच असलेल्या नेटवर्कमध्ये 900 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडच्या तुलनेत 700 मेगाहर्ट्झ बँड कोणतेही अतिरिक्त कव्हरेज देत नाही.

अधिक वाचा :  मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, 12000 हून कमी किमतीची चीनी मोबाइल होणार बंद?

5G साठी एअरटेलची तयारी

विट्टल म्हणाले की, नॉन-स्टँडअलोन (NSA) 5G नेटवर्कला स्टँडअलोन 5G नेटवर्कच्या तुलनेत अधिक फायदे आहेत. कारण नेटवर्कमध्ये प्रवेश करण्यासाठी नॉन-स्टँडअलोन मध्ये अधिक व्यापक कव्हरेज आणि अधिक उपकरणे उपलब्ध आहेत. ते म्हणाले की अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये जेथे स्टँडअलोन आणि नॉन-स्टँडअलोन दोन्ही सुरू केले आहेत, तेथे स्टँडअलोन वरील रहदारी एकूण 5G रहदारीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. "या मोडचा तिसरा फायदा असा आहे की ते आम्हाला सध्याचे 4G तंत्रज्ञान कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वापरण्याची परवानगी देते. कारण आमच्याकडे आमच्या नेटवर्कवर लाइव्ह असलेले रेडिओ आणि स्पेक्ट्रम आधीपासूनच आहेत. शेवटी, नॉन-स्टँडअलो चा शेवटचा फायदा म्हणजे अनुभवाचा आहे. यामुळे व्हॉईसवर वेगवान कॉल कनेक्ट करण्याचा फायदा आहे. शिवाय, मध्यम बँडमध्ये आमची प्रचंड स्पेक्ट्रम होल्डिंग्स दिल्याने ते आम्हाला इतर कोणापेक्षाही जलद अपलिंक प्रदान करण्याची परवानगी देते," विट्टल म्हणाले.

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने (Jio) टॉप 1,000 शहरांमध्ये 5G कव्हरेज नियोजन पूर्ण केल्याचा दावा केला आहे.  त्यांच्या घरगुती 5G टेलिकॉम गीअर्सच्या फील्ड चाचण्या घेतल्या आहेत. प्रीमियम 700 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी करणारी ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे.

अधिक वाचा : क्रिकेट जगतावर शोककळा, या प्रसिद्ध अंपायरचे झाले निधन

एअरटेलची दणदणीत कमाई आणि नफा

विट्टल म्हणाले की, एअरटेलने प्रति ग्राहक 183 रुपयांचा सरासरी महसूल नोंदवला असून हा दूरसंचार क्षेत्रातील सर्वाधिक आहे. मोबाइल शुल्कात वाढ झाल्यामुळे तो लवकरच 200 रुपये आणि अखेरीस 300 रुपयांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे. भारती एअरटेलने जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत एकत्रित नफ्यात पाच पटीने वाढ नोंदवली असून कंपनीचा नफा 1,607 कोटी रुपयांवर पोचला आहे. मोबाइल शुल्कात वाढ झाल्याचा फायदा कंपनीला झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एअरटेलला 283.5 कोटी रुपयांचा नफा झाला होता.  

एअरटेलची आर्थिक स्थिती

या तिमाहीत भारती एअरटेलच्या कामकाजामधून एकत्रित महसूल सुमारे 22 टक्क्यांनी वाढून 32,805 कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा महसूल 26,854 कोटी रुपये होता. भारती एअरटेल इंडियाचा महसूल 24 टक्‍क्‍यांनी वाढून 23,319 कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो 18,828.4 कोटी रुपये होता. कंपनीने भारतात 5,288 कोटी रुपये आणि आफ्रिकेत 1,088 कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी