Bhawani Mandi Railway Station | हे आहे देशातील अनोखे रेल्वे स्टेशन...एका राज्यात प्रवासी रांगेत उभे, तिकीटांचे वितरण दुसऱ्या राज्यात!

Indian Railway stations : भारतातील रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दुसरीकडे देशातील विविध रेल्वे स्टेशनबद्दल बोलायचे तर, एका बाजूला आधुनिक रेल्वे स्थानकापासून एकाहून एक विचित्र स्टेशन आहेत. ही रेल्वे स्टेशन चर्चेतही राहतात आणि काही रेल्वे स्टेशन अशी आहेत की त्यांना पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. त्याच वेळी, काही रेल्वे स्टेशन त्यांच्या विचित्र नावांमुळे प्रसिद्ध आहेत.

Bhawani Mandi Railway Station
भवानी मंडी रेल्वे स्टेशन  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • देशात एका बाजूला आधुनिक रेल्वे स्थानकापासून एकाहून एक विचित्र स्टेशन आहेत
  • काही रेल्वे स्टेशन अशी आहेत की त्यांना पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात
  • एक असे अनोखे रेल्वे स्टेशन आहे जिथे प्रवासी एका राज्यात रांगा लावतात आणि तिकीट मात्र दुसऱ्या राज्यातून काढावे लागते

Bhawani Mandi Railway Station update : नवी दिल्ली :  भारतातील रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. दुसरीकडे देशातील विविध रेल्वे स्टेशनबद्दल बोलायचे तर, एका बाजूला आधुनिक रेल्वे स्थानकापासून एकाहून एक विचित्र स्टेशन आहेत. ही रेल्वे स्टेशन चर्चेतही राहतात आणि काही रेल्वे स्टेशन अशी आहेत की त्यांना पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. त्याच वेळी, काही रेल्वे स्टेशन त्यांच्या विचित्र नावांमुळे प्रसिद्ध आहेत. आज आम्ही अशाच एका अनोख्या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जिथे प्रवासी एका राज्यात रांगा लावतात आणि तिकीट मात्र दुसऱ्या राज्यातून काढावे लागते. (Bhawani Mandi Railway Station in India is unique, where passengers stand in que in one state while they get tickets in another state)

अधिक वाचा : Indian Railways Rule | रेल्वे प्रवासादरम्यान सामान चोरीला गेल्यास चिंता नसावी, मिळेल वस्तूंची भरपाई...जाणून घ्या नियम

दोन राज्यांच्या सीमेवर भवानी मंडी रेल्वे स्टेशन 

दिल्ली आणि मुंबई रेल्वे मार्गावर भवानी मंडई स्थानक येण्याबाबत जो कोणी ऐकतो तो विचारातच पडतो. कारण या रेल्वे स्टेशनवरून प्रवास सुरू करण्यासाठी प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी राजस्थान राज्यात रांगा लावाव्या लागतात. तर तिकिट मात्र मध्य प्रदेशातून काढावे लागते. वास्तविक, हे रेल्वे स्टेशन राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात आहे आणि मध्य प्रदेश-राजस्थानच्या सीमेवर आहे. देशातील हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यांच्या सीमेवर बांधले गेले आहे. त्यामुळे राजस्थान भागात तिकीट काढण्यासाठी लोक उभे राहतात आणि तिकीट देणारा कारकून मध्य प्रदेशात बसतो.

अधिक वाचा : Small Savings Schemes Update | तुमच्यासाठी आनंदाची बातमी! एप्रिल-जून 2022 साठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे...व्याजदरात बदल नाही

घराचे दरवाजे वेगवेगळ्या राज्यांत उघडतात

भवानी मंडईच्या रेल्वे स्टेशनशिवाय येथील काही घरांची अवस्थाही विचित्र आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर बांधलेल्या काही घरांचे पुढचे दरवाजे भवानी मंडी शहरात उघडतात. तर मागचे दार मध्य प्रदेशातील भैंसोडा मंडीत उघडतात. या दोन राज्यातील लोकांसाठी बाजारपेठही सारखीच आहे. मात्र, याचा फायदा ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित लोक घेतात. हे लोक मध्य प्रदेशात चोरी करून राजस्थानला पळून जातात. काहीवेळा त्याउलट राजस्थानमध्ये चोरी करून ते मध्य प्रदेशात येतात. त्यामुळे येथील पोलिसांमध्ये सीमेवरून अनेकदा वाद होतात.

अधिक वाचा : PAN-Aadhaar Linking | तुमचे आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक आहे की नाही कसे चेक कराल? पाहा सोपी पद्धत

रेल्वेचा हा नियम तुमच्या फायद्याचा

तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्या कामाची बातमी आहे. भारतीय रेल्वेच्या प्रवाशांच्या (Railway Passengers) सोयीसाठी काही खास नियम (Railway Rules)आहेत ज्यांची माहिती घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक, रेल्वेने प्रवास करणाऱ्या 80 टक्के प्रवाशांना हे नियम माहीत नसतात. यामुळे ते रेल्वेच्या (Indian Railway) सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला (Stolen goods rule)गेले तर तुम्हाला त्याची भरपाई मिळू शकते. तुम्ही तुमच्या सामानाची भरपाई मागू शकता. एवढेच नाही तर ६ महिन्यांत तुमचा माल न मिळाल्यास तुम्ही ग्राहक मंचाकडेही जाऊ शकता. असे बरेच नियम आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या नियमांची माहिती असेल तर तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही. 

सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमचे सामान चोरीला गेले तर तुम्ही आरपीएफ पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता. तसेच, त्याच वेळी, आपण एक फॉर्म देखील भरा. ६ महिने माल परत न मिळाल्यास ग्राहक मंचात तक्रार करावी, असे त्यात लिहिले आहे. एवढेच नाही तर मालाच्या किंमतीचा अंदाज घेऊन रेल्वे त्याची भरपाई देते. ज्याद्वारे तुमचे नुकसान भरून काढले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी