Union Cabinet approve Incentive Scheme for promotion of Rupay BHIM UPI: देशभरात जवळपास सर्वच ठिकाणी आता ऑनलाईन पद्धतीने व्यवहार होताना दिसून येत आहेत. रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय पेमेंट या व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन लाभ योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने यासाठी 2600 कोटी रुपयांची प्रोत्साहन लाभ योजना मंजूर केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे युजर्स आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांना इन्सेन्टिव, पर्क्स या स्वरुपात लाभ मिळणार आहे. (bhim upi transaction Incentive cabinet approves 2600 crore scheme read details in marathi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (11 जानेवारी 2023) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने रुपे डेबिट कार्ड, कमी मूल्याचे भीम यूपीआय व्यवहार यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2600 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन लाभ योजनेला मंजुरी दिली आहे. याच्या मार्फत इन्सेन्टिव, पर्क्स दिले जाईल.
हे पण वाचा : अलिबागच्या आसपास फिरण्यासारखी प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणे
BHIM UPI आणि रुपे डेबिट कार्डच्या वापरावर प्रोत्साहन लाभ योजनेसाठी एकूण 2600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 साठी पॉईंट ऑफ सेल आणि रुपे डेबिट कार्ड वापरुन ई-कॉमर्स व्यवहार, कमी मूल्याचे BHIM UPI पेमेंट या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. ग्राहकांना यूपीआय पेमेंट किंवा डेबिट कार्ड वापरावर पर्सन मर्चेंट बेसिसवर इन्सेन्टिव दिले जातील.
हे पण वाचा : शिळे अन्न खाल्ल्यावर काय होते?
रुपे डेबिट कार्ड आणि BHIM UPI व्यवहारावर इन्सेन्टिव दिले जाईल. व्यवहारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात 11.9 लाख कोटींचे व्यवहार झाले. हे व्यवहार एकूण 730 कोटी व्यवहारांत झाले आहेत. त्याच्या तुलनेत 7 टक्के वाढ झाली आहे. 2022 मध्ये यूपीआय प्लॅटफॉर्मने 125 लाख कोटी रुपयांसाठी 7404 कोटी वेळा व्यवहार पूर्ण झाले.