Cryptocurrency Crash : बापरे! क्रिप्टोकरन्सी कोसळली...बिटकॉइनची किंमत 20,000 डॉलरच्या खाली, गुंतवणुकदारांमध्ये घबराट

Cryptocurrency Market : सध्या क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठाच भूकंप आलेला आहे. सर्व आघाडीच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमतीत (Cryptocurrency Price) मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनची किंमतदेखील(Bitcoin Price) आभाळातून जमिनीवर आली आहे. क्रिप्टोकरन्सीमधील विक्री वाढल्याने 2020 च्या अखेरीनंतर शनिवारी बिटकॉइनची किंमत पहिल्यांदाच 20,000 डॉलरच्या खाली गेली आहे. CoinDesk नुसार जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये मोठी घसरण झाली आहे.

cryptocurrency market
क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ कोसळली
  • आंतरराष्ट्रीय घटकांच्या दबावामुळे क्रिप्टोकरन्सींच्या किंमतीत जबरदस्त घसरण
  • बिटकॉइनचे मूल्य 20,000 डॉलरच्या खाली आले

Bitcoin Price fall : नवी दिल्ली: सध्या क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठाच भूकंप आलेला आहे. सर्व आघाडीच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमतीत (Cryptocurrency Price) मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनची किंमतदेखील(Bitcoin Price) आभाळातून जमिनीवर आली आहे. क्रिप्टोकरन्सीमधील विक्री वाढल्याने 2020 च्या अखेरीनंतर शनिवारी बिटकॉइनची किंमत पहिल्यांदाच 20,000 डॉलरच्या खाली गेली आहे. CoinDesk नुसार जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनच्या किंमतीत 9 टक्क्यांनी घसरून त्याचे मूल्य 19,000 डॉलरच्या पातळीवर आले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये बिटकॉइनचे मूल्य या पातळीवर होते. (Big crash in Cryptocurrency prices, Bitcoin reached below $20,000)

अधिक वाचा : Sovereign Gold Bond : घसरलेले सोने मिळवा आणखी स्वस्तात, गुंतवणूक करून करा जोरदार कमाई, 20 जूनपासून संधी...जाणून घ्या

70% कोसळले बिटकॉइन

बिटकॉइनने 69,000 डॉलर चा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर बिटकॉइनच्या किंमतीत सतत चढउतार होत आहेत. आपल्या सार्वकालिक उच्चांकी पातळीपर्यंत पोचल्यापासून बिटकॉइनने 70% पेक्षा जास्त मूल्य गमावले आहे. इथेरियम या दुसऱ्या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील अलिकडच्या आठवड्यात झपाट्याने मोठी घसरण झाली आहे. शनिवारीही त्यात घसरण सुरूच होती. बिटकॉइन वगळता जवळजवळ सर्व क्रिप्टोकरन्सी टोकन मोठी घसरण दाखवत आहेत. Cardano, Solana, Dogecoin आणि Polkadot या क्रिप्टोकरन्सींनी शनिवारी 7% आणि 10% च्या दरम्यान घसरण नोंदवली आहे. मोनेरो आणि झेडकॅश सारख्या गोपनीयता टोकनमध्ये 9% घसरण झाली आहे.

अधिक वाचा : PNB Stops Incentive: पंजाब नॅशनल बॅंकेच्या 18 कोटी ग्राहकांसाठी वाईट बातमी, बँकेने तात्काळ बंद केली ही सुविधा...

तज्ञ काय म्हणतात

प्रचंड महागाईचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीसारख्या जोखमीच्या मालमत्तेतून पैसे काढून घेत आहेत. "वाढत्या मंदीची भीती क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीला आणखी जोखमीची बनवत आहे. म्हणून, सावधगिरीने क्रिप्टोमध्ये व्यवहार करा. बिटकॉइन खरेदी करण्याबाबत सावधगिरी बाळगा," असे मत ओंडा येथील वरिष्ठ बाजार विश्लेषक एडवर्ड मोया, यांनी मांडले आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 18 June 2022: सोने स्थिर, चांदी मात्र घसरली, पाहा ताजा भाव

फक्त बिटकॉइनच नाही तर जगातील सर्वच प्रमुख क्रिप्टोकरन्सी जोरात आपटल्या आहेत. इथेरियम (Ethereum) , सोलाना (Solana)आणि कार्डानो (Cardano) जोरदार घसरले आहेत. Dogecoin आणि Shiba Inu सारख्या Memecoins ला देखील याचा फटका बसला. तर दुसरीकडे इलॉन मस्कचे आवडते क्रिप्टो टोकन, डॉजकॉइन,देखील घसरले आहे. अलीकडच्या काळात तेजीत असणारे शिबा इनू अधिक क्रॅश झाले आहे. क्रिप्टोकरन्सी गंडल्यामुळे जगभरातील गुंतवणुकदार चिंताग्रस्त झाले आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या गटांगळ्या कुठवर जाऊन थांबणार याचीच चिंता गुंतवणुकदारांना लागली आहे. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न गुंतवणुकदारांपुढे निर्माण झाला आहे. 

अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील वाढलेली महागाई, त्यासंदर्भात मध्यवर्ती बॅंका उचलत असलेली पावले, खासकरून अमेरिकन फेडरल रिझर्व्हने वाढवलेले व्याजदर यामुळे वित्तीय बाजारावर विपरित परिणाम होतो आहे. व्याजदर वाढल्याचा मोठा फटका शेअर बाजार आणि क्रिप्टोकरन्सीच्या बाजाराला बसतो आहे. दोन्हींमध्ये सध्या जोरदार घसरण सुरू आहे. ही घसरण कुठपर्यत जाऊन पोचणार याबद्दल गुंतवणुकदार चिंता व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी