Interest Rates Hike: बँक ऑफ बडोदा (BoB) ने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवण्यात आला आहे. (Big gift to customers from this bank, increased interest rate on FD)
अधिक वाचा : जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा देणाऱ्या देशांमध्ये भारत कितवा?
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाने विविध मुदतीच्या एफडीसाठी व्याजदर सुधारित केले आहेत. आता सर्वसामान्यांसाठी 3 टक्के ते 5.50 टक्के व्याजदर, तर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 3.50 ते 6.50 टक्के व्याज मिळणार आहे. नवे दर बुधवार 28 जुलैपासून लागू झाले आहेत.
अधिक वाचा : मुंबई पुण्यात इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्राच्या निव्वळ नफ्यात या वर्षाच्या तिमाहीत 825.2% ची वाढ
बदलानंतर नवीन व्याजदरांबद्दल बोलताना, बँक ऑफ बडोदा (BoB) ने 7 दिवस ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 2.80% वरून 3% पर्यंत वाढवला आहे. 46 दिवस ते 180 दिवसांच्या FD वर 3.70% वरून 4% पर्यंत वाढ केली आहे. याशिवाय, 181 दिवसांपासून ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 4.30 टक्क्यांवरून 4.65 टक्क्यांनी 35 आधार अंकांनी वाढवला आहे.
इतर मुदतीच्या FD मध्ये, ग्राहकांना 271 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत पूर्ण झालेल्या FD वर 4.40 टक्क्यांऐवजी 4.65 टक्के दराने व्याज मिळेल. 1 वर्षाच्या FD वरील दर 5 वरून 5.30 टक्के करण्यात आले आहेत. त्याच वेळी, एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.45 टक्के व्याज दिले जाईल, दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज दिले जाईल. तीन वर्षे आणि 10 वर्षांच्या FD वर आता 5.35 वरून 5.50 टक्के व्याज मिळेल.
अधिक वाचा : Indian Railways Update : खूशखबर! आता महिलांना मिळणार ट्रेनमध्ये कन्फर्म सीट, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
ज्येष्ठ नागरिकांसाठी, 7 दिवस आणि 3 वर्षांच्या मुदतीच्या FD वर सामान्य दरापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज दिले जाईल. याशिवाय 3 ते 5 वर्षांत पूर्ण झालेल्या ठेवीवर 0.50 टक्के अधिक 0.15 टक्के अतिरिक्त व्याज मिळत राहील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुढील आठवड्यात आरबीआय रेपो दराबाबत निर्णय घेऊ शकते, अशा वेळी बँक ऑफ बडोदाने वाढत्या व्याजदराची भेट दिली आहे.