EPFO Update: ईपीएफओच्या 73 लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, लवकरच खात्यात ट्रान्सफर होणार रक्कम

EPFO Pension : ईपीएफओच्या 73 लाख पेन्शनधारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. सरकार त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या तयारीत आहे. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ (EPFO) 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली (central pension disbursal system) स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार केल्यानंतर त्याला मंजुरी देईल.

EPFO Pensioners
ईपीएफओचे पेन्शनधारक 
थोडं पण कामाचं
  • ईपीएफओच्या पेन्शनधारकांना सीबीटीकडून मिळणार मोठा दिलासा
  • लवकरच केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली लागू होण्याची शक्यता
  • एकावेळी सर्व पेन्शन खात्यांमध्ये जमा होणार पैसे

EPFO Pensioners : नवी दिल्ली : ईपीएफओच्या 73 लाख पेन्शनधारकांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. सरकार त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या तयारीत आहे. खरं तर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ (EPFO) 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली (central pension disbursal system) स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार केल्यानंतर त्याला मंजुरी देईल. या प्रणालीच्या स्थापनेमुळे, देशभरातील 73 पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन (Pension) एकाच वेळी हस्तांतरित केले जाऊ शकते. (Big news for 73 lakhs EPFO pensioners, now all will get pension at a time)

अधिक वाचा : YouTube : एका क्षणात तुमचा खिसा पूर्ण रिकामा करू शकतात हे युट्युब व्हिडिओ, फ्रॉड करण्याची हॅकर्सची नवीन पद्धत...

सध्या काय नियम आहेत?

सध्या EPFO ​​ची 138 प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन हस्तांतरित करतात. अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि वेळेला पेन्शन मिळते. एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, 29 आणि 30 जुलै रोजी होणाऱ्या EPFO ​​ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) च्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला जाईल. .

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली बसवल्यानंतर 138 क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेन्शनचे वितरण केले जाईल. यामुळे 73 लाख पेन्शनधारकांना एकाच वेळी पेन्शन दिली जाणार आहे. सूत्राने सांगितले की, सर्व क्षेत्रीय कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या गरजा वेगळ्या पद्धतीने हाताळतात. यामुळे पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी पेन्शन मिळते.

अधिक वाचा : TATA IPO: कमाईची मोठी संधी! 18 वर्षात पहिल्यांदाच आयपीओ आणतोय टाटा समूह, तारीख आणि तपशील जाणून घ्या

काय आहे योजना ?

20 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या CBT च्या 229 व्या बैठकीत, C-DAC द्वारे केंद्रीकृत IT आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला विश्वस्तांनी मान्यता दिली होती. कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यानंतर प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसमध्ये हस्तांतरित केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि वितरण सुलभ होईल.

अधिक वाचा : एलॉन मस्कने रद्द केले ट्विटर डील, ट्विटर मस्क विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

लवकरच मिळणार पीएफवरील व्याज

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच ईपीएफओच्या ( EPFO) 7 कोटी सदस्यांसाठी म्हणजे पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकार लवकरच पीएफ ​​खातेधारकांच्या खात्यात (EPF Account)2021-22या आर्थिक वर्षाचे व्याज (PF interest)हस्तांतरित करणार आहे. तुमच्या माहितीसाठी यावेळी 8.1 टक्के दराने पीएफवर व्याज मिळणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-22या आर्थिक वर्षामध्ये पीएफ खात्यावर मिळालेल्या व्याजाची गणना केली आहे. लवकरच ते खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित केले जाईल. यावेळी सरकारच्या खात्यात जमा झालेले एकूण 72,000 कोटी रुपये नोकरदारांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. 

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गेल्या वर्षी पीएफ खातेधारकांना व्याजासाठी 6 ते 8 महिने वाट पाहावी  लागली होती. पण, गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे परिस्थितीत वेगळी होती. यंदा सरकार दिरंगाई करणार नाही. प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार, 15 जुलैपर्यंत व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. या वर्षीचा पीएफवरील व्याजदर हा मागील 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी