PM Kisan Yojana eKYC : 12 व्या हफ्त्याचा लाभ घेणाऱ्यांना दिलासा, वाढली KYC ची मुदत

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana beneficiaries) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत सरकारने ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधीच्या 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीच्या तुलनेत ही मुदत एक महिन्याने वाढवून 31 ऑगस्ट 2022 करण्यात आली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana
पीएम किसान सम्मान निधी योजना 
थोडं पण कामाचं
  • 31 मे 2022 रोजी 10 कोटी शेतकर्‍यांना 21,000 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.
  • दरवर्षी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 6000 रुपये वर्ग केले जातात.
  • दरवर्षी 2,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये अन्नदात्यांसाठी दिले जातात.

PM Kisan Samman Nidhi Yojana e-KYC deadline:नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana beneficiaries) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत सरकारने ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधीच्या 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीच्या तुलनेत ही मुदत एक महिन्याने वाढवून 31 ऑगस्ट 2022 करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण 6000 रुपये जमा केले जातात. (Big relief for beneficiaries of PM Kisan Yojana as deadline for eKYC extended)

अधिक वाचा : BCCI: सौरव गांगुलीने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल केलं मोठं वक्तव्य

केवायसीसाठी दोन पद्धती उपलब्ध 

पीएम किसान पोर्टलवरील सूचनेनुसार, 'सर्व पीएम किसान लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे'. तुमच्या माहितीसाठी पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. PM किसान पोर्टलवर OTP आधारित eKYC सुविधा उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित केवायसीसाठी लाभार्थी जवळच्या सीएससी केंद्रांशी देखील संपर्क साधू शकतात.

अधिक वाचा : बाळाला जन्म देताना हत्तींनी का केला घोळका?, व्हायरल झाला Video

ई-केवायसी ऑनलाइन कसे करावे? (पीएम किसान योजनेत eKYC कसे पूर्ण करावे)

  1. सर्वप्रथम पीएम किसान PM Kisan Yojana Portal)च्या अधिकृत वेबपेजवर जा.
  2. पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
  3. आता आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि नंतर शोध वर क्लिक करा.
  4. त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
  5. त्यानंतर 'गेट ओटीपी' वर क्लिक करा आणि निर्दिष्ट फील्डमध्ये ओटीपी टाका.
  6. जर सर्व माहिती बरोबर असेल, तर eKYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अन्यथा ती बाद होईल. असे झाल्यास, तुमच्या स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधा. PM किसानचा 12वा हप्ता मिळवण्यासाठी अन्नदाताने KYC अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या हप्त्यात 2000 रुपये घ्यायचे असतील तर नक्कीच KYC करा.

अधिक वाचा : Army jawan shot dead : रेल्वे स्थानकावर जात असताना लष्कराच्या जवानाला लुटले, गोळ्या घालून केले ठार

सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) हितासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) देखील आहे. पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते आहे. पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% निधी असलेली योजना आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. आता पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर एक काम पूर्ण करावे लागेल, नाहीतर ते पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू शकतात. ईकेवायसी पूर्ण करण्याची मुदत एक महिन्याने वाढवून 31 ऑगस्ट 2022 करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी