7th Pay Commission | डीएच्या थकबाकीसंदर्भात मोठी बातमी...कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर रक्कम

DA Arrears for central employees | लवकरच केंद्रीय कर्मचारी (Central government employees) आणि पेन्शनर्ससाठी (Pensioners)मोठी घोषणा करू शकते. प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार महागाई भत्त्याच्या थकबाकीची (DA Arrears) वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळू शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळ (Union Cabinet) आपल्या पुढील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

Central employees to get DA arrears
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्त्याची थकबाकी 
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकार डीए थकबाकीसंदर्भात मोठी घोषणा करू शकते
  • लेव्हल-१ कर्मचाऱ्यांसाठी डीएच थकबाकीची रक्कम ११,८८० पासून ते ३७,५५४ रुपये असू शकते
  • सरकार कर्मचारी आणि पेन्शनर्सना वर्षात दोन वेळा डीए आणि डीआरचा लाभ देते

Dearness Allowance Arrears | नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi Government) लवकरच केंद्रीय कर्मचारी (Central government  employees) आणि पेन्शनर्ससाठी (Pensioners)मोठी घोषणा करू शकते. प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार महागाई भत्त्याच्या थकबाकीची (DA Arrears) वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच याचा लाभ मिळू शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळ (Union Cabinet) आपल्या पुढील बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२१ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्ससाठी डीए (DA)आणि डीआरमध्ये (DR) वाढ करण्यात आली होती. (7th Pay Commission: Big relief for central government employees, Modi government may announce DA arrears)

कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या डीएमध्ये वाढ

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या डीए आणि डीआर मध्ये वाढ होत तो १७ टक्क्यांवरून वाढवून ३१ टक्के करण्यात आला होता. मात्र कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता जरी लागू करण्यात आला असला तरी ती सध्याच्या वेतनापासून लागू झाली आहे. वाढीव डीए लागू केल्यापासून आतापर्यतची थकबाकी कर्मचारी आणि पेन्शनर्सना अद्याप मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांची युनियन यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करते आहे.

वर्षातून दोनदा डीए आणि डीआरचा फायदा

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्याची थकबाकी एकरकमी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी १८ महिन्यांपासून मिळालेली नाही. केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनर्सना महागाईत झालेल्या वाढीच्या भरपाईसाठी वर्षातून दोनदा डीए आणि डीआर देते. मात्र कोरोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मे २०२० पासून महागाई भत्ता थांबवला होता. ३० जून २०२१पासून सरकारने पुन्हा एकदा डीएमधील वाढ देण्यात सुरूवात केली होती. मात्र त्यावेळेस थकित महागाई भत्त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

इतकी असू शकते थकबाकीची रक्कम

प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार लेव्हल-१ कर्मचाऱ्यांसाठी थकित महागाई भत्त्याची रक्कम ११,८८० रुपयांपासून ते ३७,५५४ रुपये असू शकते. तर लेव्हल-१३ कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची थकित रक्कम १,४४,२०० रुपयांपासून ते २,१८,२०० रुपये दरम्यान असू शकते.

पंतप्रधान मोदींकडे पोचला थकबाकीचा मुद्दा

१८ महिन्यांच्या थकित महागाई भत्त्याचे प्रकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पोचले आहे. आता पीएम मोदीच यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये यासंदर्भात आशा निर्माण झाली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थकित महागाई भत्त्याला हिरवा सिग्नल दिला तर १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून ३१ टक्के झाला आहे. याचा फायदा केंद्र सरकारच्या ४८ लाख कर्मचाऱ्यांना आणि ६५ लाखांपेक्षा जास्त पेन्शनर्सला झाला आहे.

सीपीआयचे आकडा डिसेंबर 2021 पर्यंत 125 वर असल्यास महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणे शक्य आहे. म्हणजेच एकण 3 टक्के वाढून 34 टक्के होईल. याचे पेमेंट जानेवारी 2022 मध्ये केले जाईल. याच कारणामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुद्धा वाढ होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार जानेवारी 2022 च्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हाउस रेंट अलाउंस (HRA) मध्ये सुद्धा वाढ करु शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी