LPG Cylinder Subsidy Update | महागाईपासून मिळणार दिलासा, ५८७ रुपयांत मिळणार एलपीजी सिलिंडर, पाहा कसे

LPG Gas: मागील काही महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पेट्रोलियम कंपन्यांकडून मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर ९६० रुपयांवर पोचले आहे. कोरोना काळात सरकारने एलपीजीवरील सब्सिडी (LPG Gas subsidy)देणे बंद केले होते. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली होती. मात्र आता लवकरच एलपीजी सिलिंडर खूप कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

LPG Cylinder Subsidy
एलपीजी गॅस सिलिंडर सब्सिडी 
थोडं पण कामाचं
  • एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट होण्याची शक्यता
  • अर्थमंत्रालयाकडे एलपीजी सब्सिडी देण्याचा प्रस्ताव
  • एलपीजी सब्सिडीसाठी गॅस कनेक्शन आधारशी लिंक असणे आवश्यक

LPG Cylinder Subsidy | नवी दिल्ली : महागाईने (Inflation) त्रस्त झालेल्या नागरिकांना आपल्या बजेटची आखणी करणे जड जाते आहे. एलपीजी गॅस सिलिंडर (LPG Gas Cylinder) ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक बाब आहे. एलपीजी गॅस सिलिंडरशिवाय स्वयंपाक घरच चालू शकत नाही. मागील काही महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात पेट्रोलियम कंपन्यांकडून मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर ९६० रुपयांवर पोचले आहे. कोरोना काळात सरकारने एलपीजीवरील सब्सिडी (LPG Gas subsidy)देणे बंद केले होते. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली होती. मात्र आता लवकरच एलपीजी सिलिंडर खूप कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. कारण सरकार एलपीजी सिलिंडरवर पुन्हा एकदा सब्सिडी देणार आहे. (Big relief to common man, Government to give Subsidy on LPG gas cylinder)

अर्थमंत्रालयाकडे सब्सिडी देण्याचा प्रस्ताव

केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे एलपीजी गॅस सिलिंडरवरील सब्सिडी सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरवर सब्सिडी दिली जाते आहे. अर्थ मंत्रालयाला देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार देशातील इतर राज्यांमध्येदेखील एलपीजी गॅस सिलिंडरवरील सब्सिडी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. जर अर्थमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजूरी दिली तर पेट्रोलियम कंपन्यांच्या डिलरना सरकारकडून ३०३ रुपयांची सब्सिडी दिली जाईल आणि तितकीच सूट ग्राहकांना त्यांच्या एलपीजी गॅस सिलिंडरवर मिळेल. म्हणजेच सब्सिडी लागू झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडरसाठी ९०० रुपये तर ५८७ रुपये द्यावे लागतील.

एलपीजी कनेक्शन आधार लिंक असणे आवश्यक

एलपीजी गॅस सिलिंडरवरील सब्सिडी मिळण्यासाठी तुमचे एलपीजी कनेक्शन आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर अजूनपर्यत तुम्ही आपले एलपीजी कनेक्शन आधारशी लिंक केलेले नसेल तर लगेच करून घ्या. तुमच्या डीलरशी संपर्क करून हे लिंकिंग करता येईल आणि सब्सिडीचा लाभ घेता येईल. सब्सिडीसंदर्भात वेळोवेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर माहिती मिळत राहील.

गॅस कनेक्शनला मोबाइलशी लिंक कसे कराल?

  1. - तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन मोबाइलशी लिंक करण्यासाठी आपल्या पेट्रोलियम कंपनीच्या म्हणजे हिंदूस्थान पेट्रोलियम किंवा इंडियन ऑइल किंवा भारत पेट्रोलियमच्या वेबसाइटवर जा. 
  2. - तिथे तुम्हाला गॅस कनेक्शन मोबाइलशी लिंक करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. - तिथे तुमचा १७ अंकी एलपीजी आयडी टाका
  4. - त्यानंतर व्हेरिफायकरून सबमिट करा.
  5. - आता बुकिंगच्या तारखेसह सर्व माहिती भरा
  6. - यानंतर तुम्हाला सब्सिडीशी संबंधित माहिती इथे मिळू शकेल.

कस्टमर केअरकडून देखील मिळेल माहिती

जर तुम्हाला वेबसाइटवर न जाता माहिती हवी असेल तर कस्टमर केअरच्या १८००-२३३-३५५५ या नंबरवर फोन करून तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडरवरील सब्सिडीची ताजी माहिती घेऊ शकता. २०२० मध्ये सरकारकडून शेवटची सब्सिडी एप्रिल महिन्यात १४७.६७ रुपयांच्या रुपात ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. तेव्हा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ७३१ रुपये होती. त्यानंतर एलपीजी सिलिंडर २०५ रुपयांनी महागले आहे. आता लोकांना ९०० रुपयांवर मोजावे लागत आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी