8th Pay Commission: नवी दिल्ली: केंद्र सरकारने (Central Government) सोमवारी केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करत नसल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना संसदेत ही माहिती दिली. (big update on 8th pay commission know latest information related to salary instantly)
यावेळी सरकारला विचारण्यात आले होते की, 'केंद्र 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची वेळेवर स्थापना करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे का? जेणेकरून 1 जानेवारी 2026 रोजी त्याची अंमलबजावणी करता येईल?'
अधिक वाचा: Bank Loan Interest Rate: या बँकांनी गृहकर्जावरील वाढवले व्याज, जाणून घ्या किती होणार EMI
कर्मचाऱ्यांना मिळतो महागाई भत्ता
आतापर्यंत 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी लागू न करण्याच्या कारणाबाबत मंत्री म्हणाले की, 7व्या वेतन आयोगाच्या आधारे वेतन आणि भत्त्यांच्या सुधारणांना मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने या मुद्द्याचा विचार केला नाही. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पगारवाढीसाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या इतर उपाययोजनांवर त्यांनी प्रकाश टाकला. 'महागाईमुळे त्यांच्या वेतनाच्या वास्तविक मूल्यात झालेल्या घसरणीची भरपाई करण्यासाठी, महागाई भत्ता (DA) दिला जातो', असे ते म्हणाले.
वर्षातून दोनदा बदलतो DA
औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांतर्गत महागाईच्या दराच्या आधारावर दर 6 महिन्यांनी DA चा दर सुधारित केला जातो. याबाब मंत्री महोदयांनी सांगितले की, 7व्या CPC च्या अध्यक्षांनी त्यांचा अहवाल पॅरा 1.22 मध्ये फॉर्वर्ड करताना, 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीची प्रतीक्षा न करता वेळोवेळी मेट्रिक्सचे पुनरावलोकन केले जावे अशी शिफारस केली होती.
अधिक वाचा: Bank Holidays August: या आठवड्यात विविध भागात 6 दिवस बंद राहणार बँका, पाहा कधी आणि कुठे आहे सुट्टी
कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन
यावेळी मंत्र्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला होता की, '7 CPC ने 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर नवीन वेतन आयोग तयार करण्याऐवजी दरवर्षी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनचा आढावा घ्यावा अशी शिफारस केली होती हेही खरे आहे का?
त्यावर मंत्री पंकज चौधरी यांनी असे उत्तर दिले की, 'याची समीक्षा आणि दुरुस्ती एक्रोइड फॉर्म्युलाच्या आधारे त्याचे पुनरावलोकन आणि केली जाऊ शकते.'