LIC IPO Update | सर्वात मोठ्या आयपीओतून लवकरच करा जोरदार कमाई.... एलआयसी आयपीओ 25 ते 29 एप्रिल दरम्यान येण्याची शक्यता

IPO Investment : प्रत्येकजण देशातील सर्वात मोठ्या मेगा आयपीओची (IPO) वाट पाहतो आहे. देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) मागील कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. आता एलआयसीच्या आयपीओसंदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार एलआयसी (LIC) आपला आयपीओ 25 ते 29 एप्रिल दरम्यान बाजारात आणू शकते.

LIC IPO Launching by April end
एलआयसीचा IPO 25 ते 29 एप्रिल दरम्यान येण्याची शक्यता 
थोडं पण कामाचं
  • आयपीओद्वारे सरकार या विमा कंपनीतील आपला 5 ते 6.5 टक्के हिस्सा विकणार
  • 13 एप्रिल रोजी सेबीकडे एलआयसी आपला UDRHP (अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल करण्याची शक्यता
  • एलआयसी आयपीओद्वारे 50,000 ते 60,000 कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना

LIC IPO Launching by April end : नवी दिल्ली :  प्रत्येकजण देशातील सर्वात मोठ्या मेगा आयपीओची (IPO) वाट पाहतो आहे. देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) मागील कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. आता एलआयसीच्या आयपीओसंदर्भात मोठे अपडेट समोर आले आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार एलआयसी (LIC) आपला आयपीओ 25 ते 29 एप्रिल दरम्यान बाजारात आणू शकते. याचबरोबर एलआयसी उद्या, 13 एप्रिल रोजी सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे आपला UDRHP (अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल करेल अशी शक्यता आहे. (Big update on LIC IPO, may be launched between 25-29 April)

अधिक वाचा : Gold Price Today | सोने आले फॉर्मात...सोन्याच्या भावात जबरदस्त तेजी, चांदीदेखील 1,000 रुपयांनी महागली, पाहा ताजा भाव

LIC चा IPO लवकरच बाजारात

याआधी केंद्र सरकार मार्चमध्ये LIC IPO लॉन्च करणार होते. परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या संकटाचा विपरित परिणाम शेअर बाजारावर झाला होता. त्यामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. आता बाजाराची स्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकार लवकरच एलआयसीचा आयपीओ आणू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकार या विमा कंपनीतील आपला 5 ते 6.5 टक्के हिस्सा विकू शकते. एलआयसी आयपीओद्वारे 50,000 ते 60,000 कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे.

अधिक वाचा : IT firm gifts Maruti Cars | तुमच्या कंपनीने तुमच्या कामाचे चीज म्हणून कार भेट दिलीय का? या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिल्या 100 मारुति कार

आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ

एलआयसीचा हा मेगा आयपीओ हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.  सरकारने यावर्षी 78,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात एलआयसीच्या या IPO द्वारे, 60,000 कोटी रुपयांहून अधिक उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

फेब्रुवारीमध्ये पाठवला होता मसुदा 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की एलआयसीने नुकतेच फेब्रुवारीमध्ये सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. या मसुद्यानुसार, LIC च्या एकूण 632 कोटी समभागांपैकी 31,62,49,885 इक्विटी शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव असतील. तर ते 15 टक्के गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी असतील.

अधिक वाचा : Adani Stocks | अदानीच्या या 3 कंपन्यांच्या शेअर्सची धूम...शेअरवर पडल्या गुंतवणुकदारांच्या उड्या, काय आहे कारण?

12 महिन्यांसाठी वैध

आता एलआयसीच्या आयपीओला SEBI ने मंजूरी दिल्यानंतर हा IPO मंजुरीच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत LIC IPO बाबत मोठा निर्णय घेण्यात आला. यामध्ये स्वयंचलित मार्गाने थेट विदेशी गुंतवणुकीला (FDIE) 20 टक्क्यांपर्यंत परवानगी देण्यात आली होती. या निर्णयानंतर एलआयसीच्या प्रस्तावित आयपीओमध्ये परकी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. प, बाजारातील नकारात्मक वातावरण पाहता परकी गुंतवणुकदारांनी मागील काही दिवसांपासून बाजारातून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.

पॉलिसीधारक-कर्मचाऱ्यांचा हिस्सा राखीव

हा हिस्सा एलआयसी पॉलिसीधारक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहे. दोघांनाही एलआयसी इश्यू सवलतीत दिला जाईल म्हणजे सवलतीत शेअर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सेबीला सादर केलेल्या मसुद्याच्या दस्तऐवजानुसार, पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के इश्यू राखून ठेवण्यात आला आहे. म्हणजेच तुमची एलआयसी पॉलिसी संपली असली तरीही तुम्ही राखीव कोट्यात बोली लावू शकता. याशिवाय ५ टक्के हिस्सा एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी