PM Kisan Update: पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट, नियमांमध्ये 3 मोठे बदल! जाणून घ्या, नाहीतर होईल नुकसान

PM Kisan Rules : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी आणि रेशन कार्ड बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करवून घेण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल तर ताबडतोब करा, नाहीतर तुमचा 12 वा (PM Kisan 12th Installment) हप्ता अडकू शकतो.

PM Kisan 12th Installment
पीएम किसान सम्मान योजनेचा 12 वा हफ्ता 
थोडं पण कामाचं
 • पीएम किसान योजनेमुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळतो
 • योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करवून घेण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022
 • या योजनेमध्ये नोंदणीसाठी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आले

PM Kisan Update : नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी आणि रेशन कार्ड बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करवून घेण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल तर ताबडतोब करा, नाहीतर तुमचा 12 वा (PM Kisan 12th Installment) हप्ता अडकू शकतो. या योजनेमध्ये नोंदणीसाठी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना नोंदणी करताना टाकलेला रेशनकार्ड क्रमांक (Ration Card) अपलोड करावा लागेल. (Big update on PM Kisan 12th installment, government changed 3 rules, check details)

अधिक वाचा : Cooperative Banks Update: सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी सरकारने केली मोठी घोषणा, पाहा मिळणार हे फायदे...

11 वा हफ्त्याचे पैसे आधीच जमा

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 12.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 21,000 कोटी ऑनलाइन पाठवण्यात आले आहेत. आता 12वा हप्ता ((PM Kisan Samman Nidhi Yojana 12th Installment)हस्तांतरित केला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता पाठवला जाण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधी अनेक नियम बदलण्यात आले आहेत, जे शेतकऱ्यांनी जाणून घ्यावे अन्यथा पुढील हप्ता अडकू शकतो.

किसान योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना रेशन कार्ड तपशील आणि ई-केवायसी मिळणे बंधनकारक झाले आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलै आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ता खात्यावर पाठवला जाणार नाही. नोंदणी दरम्यान पोर्टलवर रेशनकार्डच्या अत्यावश्यक गोष्टींसोबतच कागदपत्रांच्या फक्त सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) अपलोड कराव्या लागतील.  ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्याच शेतकऱ्यांना फायदा मिळेल, आधारशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. इथे या योजनेत कुटुंबातील एकच सदस्य, जोडीदार पैसे घेऊ शकतात.

अधिक वाचा : Petrol-Diesel Price: केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल होणार महाग? जाणून घ्या ताजी घडामोड

याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 12.50 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पोहोचतो. विशेष बाब म्हणजे योजनेच्या सुरुवातीला फक्त तेच शेतकरी पात्र मानले जात होते ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर लागवडीयोग्य शेती होती. परंतु आता मोदी सरकारने ही सक्ती काढून टाकली आहे जेणेकरून 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 02 July 2022: सोन्याला आले पुन्हा सुगीचे दिवस...पुन्हा आली तेजी, पाहा ताजा भाव

पीएम किसान यादीत तुमचे नाव पाहण्याची आणि ई-केवायसी करण्याची पद्धत-

 1. सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
 2. येथे farmer corner वर क्लिक करा आणि असे केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल.
 3. येथे beneficiary list पर्याय निवडा आणि आता फॉर्म उघडेल. यामध्ये प्रथम राज्याचे नाव, नंतर जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
 4. विनंती केलेली सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा आणि असे केल्याने तुमच्या गावातील PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर उघडेल.
 5. ही यादी पाहून तुमचे नाव लाभार्थी शेतकर्‍यांमध्ये आहे की नाही हे कळू शकते.
 6. हे ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करा
 7. सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल https://pmkisan.gov.in/.
 8. येथे तुम्हाला e-KYC च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 9. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
 10. आता सर्च ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर इथे टाका.
 11. मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी येथे भरावा लागेल. असे केल्याने तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.
   
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी