मुंबईः रिलायन्स एडीएजी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी आता अब्जाधीशाच्या क्लबमधून बाहेर पडले आहेत. २००८ साली जगभरात सर्वांत श्रींमतांच्या यादीत अनिल अंबानी सहाव्या स्थानावर होते. ईटीच्या माहितीनुसार, सोमवारी जेव्हा शेअर बाजार बंद झाला तेव्हा त्यांच्याकडून अब्जाधीश असल्याचं शिर्षक निघून गेलं. सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर अनिल अंबानी यांची ६ कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायजेशन ९१९६ कोटी रूपये राहिले. ४ महिन्याआधी पहिले अंबानी यांच्या कंपनीचं मार्केट कॅप ८ हजार कोटी रूपये होते.
आता अनिल अंबानी यांची एकूण संपत्ती १ अरब डॉलरपेक्षा कमी आहे. हा आकडा आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. कारण अंबानीनं प्रोमोटर होल्डिंग गाहण ठेवलं आहे. अनिल अंबानीनं गेल्या आठवड्यात मंगळवारी एक पत्रकार परिषद घेऊन म्हटलं की, आमच्या ग्रुपनं ३५ हजार कोटी रूपयांचं कर्ज फेडलं आहे. हे कर्ज त्यांनी १४ महिन्यात कोणत्याही बँकेच्या मदतीशिवाय फेडलं आहे.
दुसऱ्या दिवशीच ऑडिटर पीडब्लूसीनं रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स होम फायनान्सच्या ऑडिटरनं आपला राजीनामा दिला. पीडब्लूसीनं कंपनीवर फसवणुकीचा आरोप लावला. त्यानंतर एडीएजीच्या ग्रुपच्या शेअर्समध्ये घट येण्यास सुरूवात झाली. गुंतवणूकदारांनी भविष्यात टर्नअराऊंडची आशा दिसत नाही आहे. अनिल अंबानी यांनी संपत्ती त्यांच्या वाढत्या कर्जामुळे कमी होत गेली.
एवढंच काय तर मंगळवारी सुद्धा रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर, रिलायन्स नेवल इंजिनियरिंग, रिलायन्स होम फायनान्स, आरकॉम, रिलायन्स पॉवर आणि रिलय
कॅपिटलच्या शेअरमध्ये घसरण दिसली. अनिल अंबानीनं म्युचअल फंड ज्वॉईट वेंचरमध्ये ४२.८८ टक्के भार रिलायन्स निप्पॉन लाइफला विकला. या कारणानं सुद्धा मार्केट कॅपमध्ये घसरण दिसली.
आयआयएफएलच्या ईव्हीपी संजीव भसीन यांनी इटीला सांगितलं की, लोभ आणि भीती अशी ही सामान्य गोष्ट आहे. रिलायन्स कम्युनिकेशनवर जास्त भार पडलं आणि योग्य वेळेस ते परत मिळू शकलं नाही. याचा परिणाम इतर कंपन्यांवर देखील झालं.
यामुळे ग्रुप कंपन्यांचं ९० टक्के मार्केट कॅप बुडाले. दरम्यान एडीएजी ग्रुपच्या काही व्यवसायात अद्यापही पॉवर आहे. भसीन यांच्यानुसार, आताही रिलायन्स कॅपिटलची पॉवर, युटिलिटीज आणि एनबीएफसी व्यवसाय अजूनही आकर्षक आहेत.