Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सीची चमक परतली, बिटकॉइन आणि इथेरियमच्या किंमतीत झाली वाढ

Bitcoin Today : जागतिक स्तरावर आज क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) बाजार तेजी दिसून आली. वाढत्या मागणीमुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारमूल्याने पुन्हा एकदा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीत आलेल्या या तेजीमुळे बिटकॉइनच्या गुंतवणुकदारांनीही दीर्घकाळानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सध्या बिटकॉइनचे मूल्य (Bitcoin Price)22,200 डॉलरच्या वर गेल्या आहेत.

Cryptocurrency Prices
क्रिप्टोकरन्सीची दुनिया 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात पुन्हा तेजी आली
  • बिटकॉइनसह इतर क्रिप्टोकरन्सीचे मूल्य वधारले
  • मागील कित्येक महिन्यांपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये होत होती मोठी घसरण

Bitcoin Price Today : नवी दिल्ली : जागतिक स्तरावर आज क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) बाजार तेजी दिसून आली. वाढत्या मागणीमुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारमूल्याने पुन्हा एकदा 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीत आलेल्या या तेजीमुळे बिटकॉइनच्या गुंतवणुकदारांनीही दीर्घकाळानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सध्या बिटकॉइनचे मूल्य (Bitcoin Price)22,200 डॉलरच्या वर गेल्या आहेत. इथेरियमच्या किमतींमध्येही (Ethereum Price) आज वाढ झाली आहे. (Bitcoin & Ethereum prices surged today, Cryptocurrency market cap rises)

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारमूल्यात थोडीशी वाढ

CoinMarket च्या डेटानुसार, क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप म्हणजे बाजारमूल्य आज 1.01 ट्रिलियन डॉलरवर व्यवहार करत होते. कालच्या तुलनेत आज क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट कॅपमध्ये 3.4% ची वाढ झाली आहे. बिटकॉइन आज 22,218.36 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत होता. जगातील सर्वाधिक चर्चेत असलेले बिटकॉइनचे बाजारमूल्य 424.3 बिलियन डॉलरच्या जवळपास होते.

अधिक वाचा : जगणं महागलं! दही, दूध लोणी आणू कसं घरी? गृहिणींना पडला प्रश्न, 'या' वस्तू महागणार

बिटकॉइन आणि इथेरियममध्ये आली तेजी

गेल्या 24 तासांत इथेरियमच्या किंमतीत 6.39 % वाढ झाली आहे. त्यानंतर या क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप 176.85 बिलियन डॉलर झाले. गेल्या आठवड्यात, जगातील दोन सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सींमध्ये म्हणजे बिटकॉइनच्या किंमतीत 9% आणि इथेरियमच्या किंमतीत 27.5% वाढ पाहिली आहे. त्याच वेळी, Tether, USD Coin, BNB, XRP, Binance, DogeCoin च्या किंमती आज एक टक्क्यापर्यंत वाढल्या आहेत.

क्रिप्टो मार्केटमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेचे आणि क्रिप्टोकरन्सी कोसळण्यामागची गोंधळाची कारणे कोणती असू शकतात याविषयी, जाणकार म्हणतात की गुंतवणुकदार या जोखमीच्या क्रिप्टो मालमत्तेपासून दूर जात आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात चढउतार राहण्याची अपेक्षा आहे. येत्या आठवड्यात जगभरातील मध्यवर्ती बँका महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सीचा बाजार आणि वित्तीय बाजारांवर होणार आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 18 July 2022: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी, युरोपियन सेंट्रल बॅंकेच्या बैठकीपूर्वी डॉलरवर दबाव, पाहा ताजा भाव

कोसळला होता क्रिप्टोकरन्सीचा बाजार

मागील काही महिन्यांमध्ये क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात मोठाच भूकंप आलेला आहे. सर्व आघाडीच्या क्रिप्टोकरन्सींच्या किंमतीत (Cryptocurrency Price) मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनची किंमतदेखील(Bitcoin Price) आभाळातून जमिनीवर आली आहे. क्रिप्टोकरन्सीमधील विक्री वाढल्याने 2020 च्या अखेरीनंतर बिटकॉइनची किंमत पहिल्यांदाच 20,000 डॉलरच्या खाली गेली होती. CoinDesk नुसार जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये मोठी घसरण झाली आहे. बिटकॉइनच्या किंमतीत 9 टक्क्यांनी घसरून त्याचे मूल्य 19,000 डॉलरच्या पातळीवर आले होते.. नोव्हेंबर 2020 मध्ये बिटकॉइनचे मूल्य या पातळीवर होते.

अधिक वाचा : Edible Oil Price : आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण, 'या' कंपनीने एका झटक्यात कमी केले 30 रुपये...

बिटकॉइनने 69,000 डॉलर चा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर बिटकॉइनच्या किंमतीत सतत चढउतार होत आहेत. आपल्या सार्वकालिक उच्चांकी पातळीपर्यंत पोचल्यापासून बिटकॉइनने 70% पेक्षा जास्त मूल्य गमावले आहे. इथेरियम या दुसऱ्या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीतदेखील अलिकडच्या आठवड्यात झपाट्याने मोठी घसरण झाली आहे.

प्रचंड महागाईचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीसारख्या जोखमीच्या मालमत्तेतून पैसे काढून घेत आहेत. "वाढत्या मंदीची भीती क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीला आणखी जोखमीची बनवत आहे. म्हणून, सावधगिरीने क्रिप्टोमध्ये व्यवहार करा. बिटकॉइन खरेदी करण्याबाबत सावधगिरी बाळगा," असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी